एनएमएमएस शिष्यवृत्तीत गेनबा मोझे प्रशालेचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:14 AM2021-08-22T04:14:22+5:302021-08-22T04:14:22+5:30

केंद्र शासनाच्या वतीने दर वर्षी इयत्ता आठवीतील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहकार्य करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय ...

Success of Genba Moze School in NMMS Scholarship | एनएमएमएस शिष्यवृत्तीत गेनबा मोझे प्रशालेचे यश

एनएमएमएस शिष्यवृत्तीत गेनबा मोझे प्रशालेचे यश

Next

केंद्र शासनाच्या वतीने दर वर्षी इयत्ता आठवीतील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहकार्य करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. मोझे प्रशालेमधील ४० विद्यार्थ्यांपैकी १२ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. या १२ विद्यार्थ्यांना दर वर्षी १२ हजार रुपये याप्रमाणे चार वर्षासाठी ४८ हजार हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.

प्रशालेतील किरण शेलार, प्राची सोनवणे, स्वानंदी वाघुर्डेकर, समीक्षा कदम, श्रावणी तौर ,हर्षिता साखरे कोमल डिघोळे, योगेश पोळ, संदेश गायकवाड, प्रतिक्षा रणदिवे, अस्मिता गभाले ,पार्थ पिस्का, या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना एनएमएमएस स्पर्धा परीक्षेसाठी संभाजी बोऱ्हाडे , रघुनाथ रांधवन, संजय सुर्वे, सुजाता जगताप, संतोष थेऊरकर, वृषाली बोरुडे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व पालकांचे संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ मोझे ,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोझे, शालेय समिती अध्यक्षा अलका पाटील, सदस्य संजय मोझे, मुख्याध्यापक जालिंदर भागवत, उपमुख्याध्यापक लक्ष्मण यादव, पर्यवेक्षक मारूती दसगुडे यांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: Success of Genba Moze School in NMMS Scholarship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.