कोरेगाव भीमा: शिक्रापूर (ता. शिरूर) येथील नित्याचीच डोकेदुखी झालेली वाहतूक कोंडी व अवैध धंद्यांवर धडक कारवाई करणाऱ्या व अल्पावधीतच शिक्रापुरचा सिंघम पोलीस अधिकारी म्हणून नावाजलेले पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांची दीड महिन्यातच पुणे नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.शिक्रापूर ता. शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांची पुणे मुख्यालयात बदली झाल्यानंतर शिक्रापूरसाठी सिंगम अधिकाऱ्यांची गरज असताना पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांची नियुक्ती करण्यात आली होती. नियुक्त झाल्यानतर संतोष गिरीगोसावी यांची पुणे नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करत वाहतूक कोंडीचा प्रश्न पूर्णपणे सोडविला व पुणे नगर रस्त्याला मोकळा श्वास मिळवून दिला. तसेच त्यांनी या भागातील दोन खासगी सावकारांना जेरबंद देखील केले व विविध प्रकारच्या गुन्हेगारींवर लक्ष केंद्रित करत असताना पोलीस अधिक्षक सुवेज हक यांनी बुधवार २० जून रोजी रात्री संतोष गिरीगोसावी यांची पुणे नियंत्रण कक्षात नियुक्ती करून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सदाशिव शेलार यांची नियुक्ती केली आहे. तर यावेळी बोलताना माझी नियुक्तीच कमी कालावधीसाठी व तात्पुरती असल्याचे पोलीस निरीक्षक गिरीगोसावी यांनी सांगितले. तर नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी पोलीस स्टेशनचा पदभार स्विकारला आहे.
शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांची अचानक बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 8:49 PM
अल्पावधीतच शिक्रापुरचा सिंघम पोलीस अधिकारी म्हणून नावाजलेले पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांची दीड महिन्यातच पुणे नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
ठळक मुद्देपुणे नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न पूर्णपणे मार्गी दोन खासगी सावकार जेरबंद