साखरदराची उसळी
By admin | Published: January 23, 2017 03:28 AM2017-01-23T03:28:10+5:302017-01-23T03:28:10+5:30
चालू हंगामात साखर धंद्याला ‘अच्छे दिन’ आले आहेत. चालू एका महिन्यात साखरेने क्विंटलमागे तब्बल ३०५ रुपयांची उसळी
Next
सोमेश्वरनगर : चालू हंगामात साखर धंद्याला ‘अच्छे दिन’ आले आहेत. चालू एका महिन्यात साखरेने क्विंटलमागे तब्बल ३०५ रुपयांची उसळी घेतली आहे. गेल्या चार महिन्यांत साखरेची क्विंटलमागे तब्बल ४०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चालू हंगामात साखर कारखान्यांनी वाढलेल्या दराच्या पैशाचा उपयोग गेटकेन ऊस मिळविण्यासाठी केला आहे.
एकीकडे साखरेला चांगला दर तर दुसरीकडे उसाचा तुटवडा अशा द्विधा मन:स्थितीत कारखाने सापडले होते. त्यामुळे कारखान्यांनी चालू हंगामात एफआरपीपेक्षा टनाला ७०० ते ८०० रुपये देऊन उसाची उपलब्धता केली. उसाची पळवापळवी करण्यावरून अनेक कारखान्यांच्या कामगारांमध्ये हाणामारीसुद्धा झाली होती.