जन्मदात्याने दोघा मुलांचा खून करून केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:04 AM2018-08-19T00:04:57+5:302018-08-19T00:05:20+5:30

जन्मदात्या पित्यानेच पोटच्या दोघा मुलांचा गळा आवळून खून करत स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.

Suicide by killing two children | जन्मदात्याने दोघा मुलांचा खून करून केली आत्महत्या

जन्मदात्याने दोघा मुलांचा खून करून केली आत्महत्या

Next

वाकड : ताथवडे येथील नृसिंह कॉलनीत जन्मदात्या पित्यानेच पोटच्या दोघा मुलांचा गळा आवळून खून करत स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी (दि. १८) दुपारी एक वाजताच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
दीपक बर्मन (वय ३५, रा. नृसिंह कॉलनी ताथवडे, मूळ रा. पश्चिम बंगाल) असे आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव आहे. शुभम दीपक बर्मन (वय १०) व रूपम दीपक बर्मन (वय ८) असे खून झालेल्या मुलांची नावे आहेत.
वाकड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी याबाबत दिलेली माहिती अशी की, बर्मन कुटुंबीय ताथवडे येथे संजय ढगे यांच्या खोलीत भाडेतत्त्वावर वास्तव्यास होते. दीपक बर्मन हा सुरक्षारक्षकाचे काम करत. त्याची पत्नी मालतीदेखील जवळच्याच कंपनीत नोकरी करतात. दुपारी घरी शाळेतून आलेली दोन्ही मुले व दीपक हे तिघेच घरी होते. त्या वेळी दीपक याने आपल्या दोन्ही मुलांचा गळा आवळून खून केला. नंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.
दुपारी एक वाजता पत्नी
मालती घरी जेवायला आल्या. त्या वेळी पती दीपक गळफास घेतलेल्या अवस्थेत आणि मुले खाली निपचित पडली असल्याचे मालती यांना दिसले. हे पाहून भांबावलेल्या मालती यांनी आरडाओरडा करताच शेजारी जमा झाले.
यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. दोन्ही मुलांना तत्काळ पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
शुभम आणि रूपम हे दोघेही येथील बाल सेवा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये अनुक्रमे सहावी आणि चौथीत शिकत होते.

दोन्हीही गोड मुलांचा जन्मदात्या पित्यानेच खून केल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वांचे मन सुन्न झाले. प्रत्येक जण हळहळ व्यक्त करीत होता. दीपक याने नेमके कशामुळे हे टोकाचे पाऊल उचलले, या खून आणि आत्महत्येमागे नेमके कारण काय, याचा पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: Suicide by killing two children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.