उकाड्याने उन्हाळ्याची चाहूूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:11 AM2021-02-15T04:11:50+5:302021-02-15T04:11:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : उत्तर मध्य महाराष्ट व लगतच्या भागात चक्रीय चक्रवात कायम आहे. केरळ किनारपट्टी लगतच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : उत्तर मध्य महाराष्ट व लगतच्या भागात चक्रीय चक्रवात कायम आहे. केरळ किनारपट्टी लगतच्या आग्नेय अरबी समुद्रापासून उत्तर मध्य महाराष्टावरील चक्रीय चक्रवातापर्यंत कमी दाबाचा पट्टा आता उत्तर केरळ किनारपट्टी ते उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत आहे. याचा परिणाम राज्यात विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान पुणे येथे १३.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
अरबी समुद्रापासून उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने तापमानात वाढ झाली आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणचे दिवसाचे तापमान सरासरीच्या तुलनेत वाढले असून रविवारी सर्वत्र उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. रविवारी सायंकाळी राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ३५.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. त्याचवेळी किमान तापमानातही सरासरीपेक्षा अधिक नोंदविले गेले आहे. विदर्भाच्या बर्याच भागात तर मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.
१६ फेबुवारी रोजी मराठवाडा व विदभार्त मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटा होण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
१७ फेब्रुवारी रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात बर्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
१८ फेब्रुवारी रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात बर्याच ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.