आपल्या कामात झोकून दिले पाहिजे- सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 01:27 AM2019-03-07T01:27:25+5:302019-03-07T01:27:35+5:30

आरक्षणामुळे मिळालेल्या पदाला न्याय देण्यासाठी महिलांनी आपल्या कामात झोकून दिले पाहिजे

Supervised your work - Supriya Sule | आपल्या कामात झोकून दिले पाहिजे- सुप्रिया सुळे

आपल्या कामात झोकून दिले पाहिजे- सुप्रिया सुळे

Next

धनकवडी : आरक्षणामुळे मिळालेल्या पदाला न्याय देण्यासाठी महिलांनी आपल्या कामात झोकून दिले पाहिजे आणि कुटुंबीयांनी ही तिला साथ दिली पाहिजे, तरच महिला आरक्षणाचा उद्देश सफल होऊ शकतो, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. धनकवडी येथील लोकनेते शरदचंद्र पवार बहुउद्देशीय भवन येथे जवळ आलेल्या महिलादिनाचे औचित्य साधत स्वयंसिद्ध योग वर्गाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या वेळी उपस्थित महिलांना संबोधित करताना खासदार सुळे बोलत होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. या वेळी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या सरोजनी नायडू, सुलोचना बोबडे, जयमाला शेटे, रत्नमला निकाळजे, लता शेडगे या पाच महिलांना आदर्श महिला पुरस्कार खासदार सुळे यांच्या हस्ते देण्यात आला.
नगरसेविका अश्विनी सागर भागवत व कनिफनाथ तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी नगरसेविका अश्विनी भागवत म्हणाल्या की, महिलांना त्यांच्या नैसर्गिक क्षमता, गुणधर्म, परंपरा, कार्यशक्ती यांच्यासह सर्व क्षेत्रात समानतेची वागणूक दिली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होत असल्याचे सार्थक होईल.
या वेळी नगरसेवक दत्तात्रय धनकवडे , अप्पा रेणुसे, विशाल तांबे, बाळासाहेब धनकवडे, स्मिता कोंढरे, रुपाली चाकणकर, वैशाली नागवडे हे प्रमुख पाहुणे कार्यक्रमास उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेविका अश्विनी भागवत
यांनी केले, तर आभार
मंडळाचे आध्यक्ष सागर भागवत यांनी मानले.

Web Title: Supervised your work - Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.