गुंजवणीचे पाणी बंद पाइपलाइनद्वारे पुरंदर तालुक्यात नेणार असल्याने बंद पाइपलाइनचे सर्वेक्षण सतत बदलत आहे. गुंजवणी धरणावर असलेल्या कानंदी नदीच्या बाजूने बंद पाइपलाइनचे सर्वेक्षण झाले असल्याचे समजते. त्याला तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे. नदीच्या बाजूने बंद पाइपलाइन गेली तर या ठिकाणी कमी क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये बंद पाइपलाइनबाबत शंका निर्माण झाली आहे. ज्या हक्काने वांगणी व वाजेघर जलसिंचन उपसा योजनेला मंजुरी मिळाली, त्याचप्रमाणे तालुक्यातील डोंगराच्या बाजूने म्हणजे अधिक उंचीच्या बाजूने बंद पाइपलाइन गेल्यास तालुक्यातील जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली येणार आहे. डोंगराच्या बाजूने बंद पाइपलाइन करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा स्थानिक शेतकऱ्यांची सह्यांची मोहीम राबवून तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपकडून देण्यात आला आहे. या वेळी भाजपाचे वेल्हे तालुकाध्यक्ष सुनील जागडे, महिला अध्यक्षा सुषमा जागडे, अविनाश भोसले, देविदास हनमघर, दिनकर मळेकर, सुनील धिंडले, अंकुश कदम आदींसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
२२ मार्गासनी
तहसील कार्यालयात मागणीचे निवेदन देताना भाजप पदाधिकारी.