पुणे : रॅगिंग प्रकरणातील दोषी विद्यार्थ्यांना एमआयटी प्रशासनाकडून पाठीशी घातले जात आहे, अशी टिका होत असल्यामुळे अखेर अभियांत्रिकी महाविद्यालयातील एका विद्यार्थ्यावर रॅगिंग केल्या प्रकरणी जामिनावर सुटलेल्या तीन विद्यार्थ्यांवर महाविद्यालय प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली.अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांनी आपल्याच वर्गातील एका विद्यार्थ्यावर रॅगिंग केली असल्याची घटना सुमारे तीन महिन्यापूर्वी समोर आली होती. त्या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी यश मिलन नाईक (वय १९), निखिल भास्कर श्रीमल (वय २१), तेजस सतीश मिरजकर (वय २१) या तीन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला होता. सध्या हे विद्यार्थी जामिनावर सुटले होते. परंतु, महाविद्यालयाकडून या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई केली गेली नव्हती. परिणामी रॅगिंग झालेल्या पिडीत विद्यार्थ्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाकडे याबाबतची तक्रार दिली होती. त्यावरविद्यापीठ अनुदान आयोगातर्फे सुध्दा महाविद्यालय प्रशासनाला याबाबतचा जाब विचारला जात होता.(वार्ताहर)
रॅगिंग करणारे ३ विद्यार्थी निलंबित
By admin | Published: December 31, 2014 11:16 PM