पुणे : ठराविक आठ अग्निशामक अधिकाऱ्यांना अपात्र असताना, नियमात शिथिलता देऊन विभागीय अधिकारी अभ्यासक्रमास पाठविणाऱ्या जबाबदार अग्निशामक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. स्टेशनड्युटी आॅफिसर पदाचा अभ्यासक्रम पूर्ण न करताच अग्निशामक विभागाने ८ अधिकाऱ्यांना विभागीय अधिकारी अभ्यासक्रमासाठी निवड केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्यावरून महापालिकेने अग्निशामक विभागाकडे खुलासा मागितला असून, सेवाज्येष्ठता यादी तपासण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी मुख्यमंत्री कार्यालय आणि महापालिकेकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे. ज्या अधिकाऱ्यांना विभागीय अधिकारी अभ्यासक्रमासाठी नियमांमध्ये शिथिलता दिली, त्याच अधिकाऱ्यांना सबआॅफिसर अभ्यासक्रमासाठी देखील नियमात शिथिलता घेतल्याचे त्या पत्रात म्हटले आहे. अग्निशामक विभागाने महापालिकेची फसवणूक करीत ही यादी तयार केली आहे. स्थायी समितीने संबंधित अभ्यासक्रमाच्या खर्चाला मान्यता देताना सेवेत दहा वर्षे राहणे, बढतीच्या जागेवर हक्क न सांगणे असा करारनामा करणे आवश्यक आहे. मात्र, असा करारनामा करण्यात आला नाही. याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
शिथिलता देणाऱ्या अग्निशामक अधिकाऱ्यांवर कारवाई करा, आरटीआय कार्यकर्त्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 1:55 PM
ठराविक आठ अग्निशामक अधिकाऱ्यांना अपात्र असताना, नियमात शिथिलता देऊन विभागीय अधिकारी अभ्यासक्रमास पाठविणाऱ्या जबाबदार अग्निशामक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.
ठळक मुद्देअभ्यासक्रम पूर्ण न करताच अग्निशामक विभागाने ८ अधिकाऱ्यांची केली निवड माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांची मुख्यमंत्री कार्यालय, महापालिकेकडे कारवाईची मागणी