कोरेगाव भीमाप्रकरणी उपाययोजना करा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 01:59 AM2018-10-30T01:59:18+5:302018-10-30T01:59:33+5:30
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; नोव्हेंबरमध्ये संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
पुणे : कोरेगाव भीमा येथे दोन गटांत झालेल्या वादातून निर्माण झालेल्या स्थितीनंतर स्थानिक नागरिकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण आहे. तसेच, जिल्हा प्रशासनाने अद्याप येथील स्थितीमध्ये सुधारणा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे येत्या १ जानेवारी २०१९ रोजी कोरेगाव भीमा येथे होणाºया कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व समविचारी संघटनांची जिल्हाधिकाºयांनी संयुक्त बैठक घ्यावी, या मागणीचे निवेदन विविध दलित संघटनांच्या संयुक्त समितीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना सोमवारी दिले.
कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीचे पडसाद महाराष्ट्रासह देशभरात उमटले. महाराष्ट्राच्या विधिमंडळापासून संसदेपर्यंत यावर चर्चा झाली. दंगलीमध्ये एका तरुणाचा जीव गेला. तसेच, जाळपोळीमध्ये काही वाहनांचे आणि दुकानांचे नुकसान झाले. परिसरातील काही नागरिकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण आहे. पुढील दोन महिन्यांनंतर २ जानेवारी २०१९ रोजी लाखो आंबेडकरी अनुयायी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने आत्तापासूनच तयारी सुरू करावी, अशी मागणी दलित संघटनांकडून करण्यात आली. या वेळी आयपीआयचे नेते परशुराम वाडेकर, बाळासाहेब जानराव, राहुल डंबाळे, विवेक चव्हाण आदी उपस्थित होते. गेल्या वर्षी कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच, महाराष्ट्रासह देशभरातून येणाºया आंबेडकरी अनुयायांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली. त्यावर नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या किंवा दुसºया आठवड्यात बैठक घेऊ, असे नवल किशोर राम यांनी सांगितले.