पुणे : पीएमपीचे चालक बस चालवत असताना अनेकदा फाेनवर बाेलताना दिसून येतात. याबाबत पीएमपीकडे अनेकदा तक्रार करुनही फारशी कारवाई हाेत नसल्याते चित्र अाहे. बस चालवत असताना फाेनवर बाेलत असताना चालक स्वतःसाेबतच प्रवाशांचा जीवही धाेक्यात घालत असतात. परंतु अाता एखादा चालक बस चालवत असताना फाेनवर बाेलत असेल तर प्रवाशांना बक्षीस मिळविण्याची नामी संधी अाहे. पीएमपीकडून चालत्या बसमध्ये माेबाईलवर बाेलताना चालकाचा फाेटाे पाठविणाऱ्यांना एक हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार अाहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने या निर्णयावर शिक्कामाेर्तब केले असून, त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात अाली अाहे. पीएमपी चालकांची मुजाेरी अनेक घटनांमधून समाेर अाली अाहे. नुकताच रात्रीच्या वेळी प्रवास करत असताना एका महिलेला महिलांसाठी राखीव असणाऱ्या ठिकाणी जागा करुन न देता तिच्या पतीला खाली उतरविण्याचा प्रकार घडला हाेता. पीएमपीचे कर्मचारी प्रवाशांना सहकार्य करत नसल्याचे चित्र अाहे. काही वर्षांपूर्वी पीएमपी प्रशासनाने या चालकांना अावर घालण्यासाठी ही याेजना तयार केली हाेती. त्यानुसार चालकांचे छायाचित्र काढणाऱ्या प्रवासी, नागरिकांना एक हजार रुपये बक्षीस दिले जात हाेते. मागील वर्षी ही याेजना गुंडाळण्यास अाली हाेती. ही याेजना पुन्हा सुरु करण्यासाठी प्रवासी संघटनांनी पाठपुरावा केला हाेता. त्यानुसार पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी याेजनेला मान्यता दिली अाहे. नवीन याेजनेनुसार माेबाईलवर बाेलताना चालक अाढळून अाल्यास त्याला 2 हजार रुपयांचा दंड केला जाईल. या दंडाची रक्कम त्याच्या वेतनातून वसूल करण्यात येणार अाहे. त्यापैकी एक हजार रुपये छायाचित्र पाठविणाऱ्यास, तर एक हजार रुपये कामागार कल्याण याेजनेमध्ये वर्ग केले जातील तसेच तक्रारदाराला महिन्यातून केवळ तीन छायाचित्रांसाठीच बक्षीस मिळणार अाहे. उर्वरित छायाचित्रांसाठीची बक्षीस रक्कम कामगार कल्याण याेजनेत जमा केली जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात अाली अाहे. चालत्या बसमध्ये फाेनवर बाेलणाऱ्या चालकाचे छायाचित्र पीएमपीच्या वाहतूक विभागाकडे किंवा संकेतस्थळावर पाठवावे लागणार अाहे. या छायाचित्रावर बसचा क्रमांक अावश्यक अाहे. त्याचबराेबर प्रवासाची वेळ, मार्ग क्रमांक व बस काेठून काेठे जात हाेती, ही माहिती नमूद करणे अावश्यक अाहे. त्यानुसार शहानिशा करुन संबंधितांना बक्षिसाची रक्कम दिली जाणार अाहे. प्रवाशांना छायाचित्र tmope@pmpml.org या ई-मेलवर पाठवायची अाहेत. किंवा 020-24545454 या हेल्पलाईनवर संपर्क साधता येईल.
पीएमपी प्रवाशांनाे, फाेटाे काढा बक्षीस मिळवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 1:46 PM
पीएमपीचे चालक जर बस चालवत असताना फाेनवर बाेलताना अाढळल्यास प्रवासी त्यांच्या फाेटाे काढून पीएमपीला पाठवू शकतात. त्या छायाचित्राची शहानिशा करुन पीएमपी प्रवाशाला बक्षीस देणार अाहे.
ठळक मुद्देएक हजार रुपयांचे मिळणार बक्षीसमहिन्यातून तीन छायाचित्रासाठीच बक्षीस मिळणार