राज्यातील तापमानात होणार पुन्हा वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:00 AM2021-02-05T05:00:40+5:302021-02-05T05:00:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : उत्तर केरळ, कर्नाटक किनारपट्टी, दक्षिण मध्य महाराष्ट्र ते मराठवाड्यापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : उत्तर केरळ, कर्नाटक किनारपट्टी, दक्षिण मध्य महाराष्ट्र ते मराठवाड्यापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यातील तापमानात पुन्हा वाढ होणार आहे. त्यामुळे आता या हंगामात पुन्हा थंडीची शक्यता कमी झाली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ९.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.
मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या तुरळक भागात किमान तापमानात किंचित घट झाली आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी किमान तापमान सरीसरीच्या तुलनेत घटले आहे.
पुणे शहरात किमान तापमान १२.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून ते सरासरीच्या तुलनेत ०.९ अंशाने अधिक आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिणेकडून येणारे बाष्पयुक्त वार्यांचा जोर वाढणार असल्याने सोमवारपासून किमान तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.