हातभट्टीची वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांच्या जाळ््यात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 02:33 AM2017-10-19T02:33:37+5:302017-10-19T02:33:44+5:30

यवत पोलिसांनी गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणारा टेम्पो पकडला. यावेळी २२ कॅन हातभट्टी दारू पोलिसांनी पकडली. खामगाव गाडामोडी येथून गावठी दारूची गाडी भरून पुण्याकडे निघणार असल्याची खबर यवत पोलिसांना मिळाली होती.

 Tempo traffic police mesh | हातभट्टीची वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांच्या जाळ््यात  

हातभट्टीची वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांच्या जाळ््यात  

Next

यवत : यवत पोलिसांनी गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणारा टेम्पो पकडला. यावेळी २२ कॅन हातभट्टी दारू पोलिसांनी पकडली. खामगाव गाडामोडी येथून गावठी दारूची गाडी भरून पुण्याकडे निघणार असल्याची खबर यवत पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून हा टेम्पो पकडला, याप्रकरणी चार आरोपींच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पोमधून गावठी दारू नेली जात असल्याची खबर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस गाडामोडी चौकात गेले असता तेथून एक संशयास्पद टेम्पो जाताना दिसला. या वेळी पोलीस कॉन्स्टेबल संकुल व गायकवाड यांनी टेम्पो अडविण्याचा प्रयत्न केला असता टेम्पोचालकाने टेम्पो थांबविला नाही. त्या वेळी पोलिसांनी तातडीने याबाबतची माहिती कासुर्डी टोल नाक्यावर दिली असता तेथे पोलीस नाईक दीपक पालखे व संपत खबाले यांनी टेम्पो अडविला. आरोपी योगेश एकनाथ राखपसरे (वय २२, रा. वाघोली, ता. हवेली), कैलासकुमार विश्वनाथ म्हेत्रे (वय २०, रा. हडपसर, माळवाडी), देवकी संगोडिया (रा. गाडामोडी, ता. दौंड) व सोमनाथ लोंढे (रा. हडपसर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक धान्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दीपक पालखे करीत आहेत.

टेम्पोमधून तब्बल २२ कॅन गावठी दारू सापडली. टेम्पोत असलेल्या दोघांना अटक केली. याप्रकरणी पकडलेल्या दोघांकडे दारू कोठून आणली व कोठे चालविली याबाबत पोलिसांनी विचारपूस केली असता आणखी दोघा आरोपींची नावेसमोर आली. त्यानुसार पोलिसांनी एकूण चार आरोपींच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या वेळी वाहतूक करणाºया टेम्पोसह ५ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

Web Title:  Tempo traffic police mesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.