सर्जा-राजासह श्रींच्या वैभवी रथाची चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 01:12 AM2018-06-23T01:12:44+5:302018-06-23T01:12:51+5:30
ज्ञानेश्वरमहाराज यांच्या नव्या वैभवी पालखीरथाची चाचणी सर्जा-राजाची बैलजोडी लावून घेण्यात आली.
आळंदी : ज्ञानेश्वरमहाराज यांच्या नव्या वैभवी पालखीरथाची चाचणी सर्जा-राजाची बैलजोडी लावून घेण्यात आली. या वेळी रथाच्या तांत्रिक देखभाल-दुरुस्तीची गरज असल्याचे निदर्शनास आले. येत्या १ जुलैला आळंदीतून सर्जा-राजाची मिरवणूक काढण्यात येणार आहे.
आळंदीतील श्रींच्या रथास बैलजोडी देण्याचे मानकरी रामकृष्ण घुंडरे पाटील यांनी आळंदीत सर्जा राजाची बैलजोडी खास पालखी सोहळ्यासाठी आळंदीत आणली. या बैलजोडीची खास व्यवस्था आळंदीत सुरू आहे. खुराक, पाणी, आरोग्य, स्वच्छता, पशुवैद्यकीय तपासणी केली जात असल्याचे मानकरी सचिन घुंडरे यांनी सांगितले.
आळंदी देवस्थानला यावर्षी नवीन रथ दान स्वरूपात मिळाला आहे. या नव्या रथाचा वापर व चाचणी बैलजोडीसह घेण्यात आली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष वासुदेव घुंडरे, पै. शिवाजीराव रानवडे, विठ्ठलराव घुंडरे आदी उपस्थित होते.