Baramati: नटराज नाट्य कला मंडळाच्या विरोधातील याचिका हाय कोर्टाने फेटाळल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 08:44 PM2022-10-04T20:44:31+5:302022-10-04T20:46:59+5:30

नटराज नाट्य कला मंडळाच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयात दाखल....

The petition against Nataraj Natya Kala Mandal was dismissed by the High Court | Baramati: नटराज नाट्य कला मंडळाच्या विरोधातील याचिका हाय कोर्टाने फेटाळल्या

Baramati: नटराज नाट्य कला मंडळाच्या विरोधातील याचिका हाय कोर्टाने फेटाळल्या

googlenewsNext

बारामती : येथील सांस्कृतिक क्षेत्रामध्ये भरीव असे योगदान असलेल्या नटराज नाट्य कला मंडळाच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.

बारामती येथील नगर परिषदेच्या मालकीची तीन हत्ती चौकालगत मनोरंजनात्मक हेतूकरिता नियोजित असलेली जागा बारामती नगर परिषदेने ठराव करून सांस्कृतिक क्षेत्रामधील योगदान पाहून नटराज नाट्य कला मंडळाला दिली आहे.

याबाबत चिडून जाऊन बारामती येथील सुरेंद्र श्यामसुंदर जेवरे व राहुल नंदू कांबळे यांनी दोन स्वतंत्र याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल केल्या होत्या. यामध्ये न्यायालयात बाजू मांडताना याचिकाकर्त्यांनी नटराज नाट्य कला मंडळ ही संस्था अस्तित्वातच नसून, संस्थेचे बारामती व परिसरामध्ये सांस्कृतिक क्षेत्रात कुठल्याही प्रकारचे योगदान नाही, असे म्हटले होते. यावर संस्थेच्या वतीने बाजू मांडताना नटराज नाट्य कला मंडळाच्या स्थापनेपासून ते कोरोना काळामध्ये केलेल्या कामापर्यंतचा अहवाल पुराव्यानिशी वाचून दाखवण्यात आला.

याबाबत दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती प्रसन्न बी. वऱ्हाळे व किशोर सी. संत या खंडपीठाने निर्णय देताना नटराज नाट्य कला मंडळाला दिलेली जागा ही योग्य ती सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच देण्यात आल्याचा निष्कर्ष काढत मुंबई उच्च न्यायालयाने या दोन्ही याचिका फेटाळून लावल्या. याचिकाकर्त्यांच्या वतीने तळेकर ॲड असोसिएटस् व ॲड. सुशांत प्रभुणे या वकिलांनी बाजू मांडली होती, तर नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने ॲड. अभिजित पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी बाजू मांडली.

अंतिम विजय सत्याचा आहे : किरण गुजर

नटराज नाट्य कला मंडळ या संस्थेचे अध्यक्ष किरण गुजर यांनी या निकालाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, अंतिम विजय नेहमी सत्याचा होतो.

Web Title: The petition against Nataraj Natya Kala Mandal was dismissed by the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.