त्रिपुरारी पौर्णिमेच्या सायंकाळी तरुणाचा दुर्दैवी अंत; डोक्यात झाडाची फांदी कोसळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 04:24 PM2023-11-27T16:24:53+5:302023-11-27T16:25:16+5:30

पावसाळा सुरु होण्यापूर्वीच प्रशासनाकडून धोकादायक फांद्या तोडल्या गेल्या तर अशा घटना घडून लोकांचे जीव जात नाहीत

The unfortunate end of the young man on the evening of Tripurari Purnima Death by tree branch falling on head | त्रिपुरारी पौर्णिमेच्या सायंकाळी तरुणाचा दुर्दैवी अंत; डोक्यात झाडाची फांदी कोसळून मृत्यू

त्रिपुरारी पौर्णिमेच्या सायंकाळी तरुणाचा दुर्दैवी अंत; डोक्यात झाडाची फांदी कोसळून मृत्यू

पुणे: पुण्याच्या शनिवार पेठेत त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ओंकारेश्वर मंदिराजवळ असलेल्या टपरीवर चहा पित थांबलेल्या तरुणाच्या डोक्यात झाडाची फांदी कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. अभिजीत गुंड (वय ३२, रा. कसबा पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. 

विश्रामबाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त रविवारी सायंकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांची मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी अभिजीत सायंकाळी मित्रांसोबत टपरीवर चहा पिण्यासाठी आला होता. अचानक झाडाची फांदी अभिजीतच्या डोक्यावर पडली. गंभीर जखमी झालेल्या अभिजीतला नागरिकांनी तातडीने रिक्षातून रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली. दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिकेच्या उद्यान विभागाकडून धोकादायक फांद्या तोडल्या जातात. परंतु प्रशासन दखल घेत नसल्याने अशा घटना घडतात. याला सर्वस्वी महापालिका जबाबदार असल्याचे त्याठिकाणच्या नागरिकांचे म्हणणे आहे. 

Web Title: The unfortunate end of the young man on the evening of Tripurari Purnima Death by tree branch falling on head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.