सफाई कर्मचाऱ्यांना ४ महिने पगार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 06:56 AM2018-05-22T06:56:29+5:302018-05-22T06:56:29+5:30
महापालिकेच्या वतीने शहरामध्ये दैनंदिन झाडनकाम करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचाºयांची नियुक्ती केली जाते.
पुणे : शहरामध्ये झाडन काम करणाºया कंत्राटी कर्मचाºयांचे गेले चार महिने पगार झाले नाही. यामुळे शहराच्या बहुतेक भागात या कर्मचाºयांनी दैनंदिन झाडन काम थांबविले आहे. यामुळे सध्या अनेक भागामध्ये कचºयाचे साम्राज्य झाले आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने उपाय-योजना केल्या नाही तर शहराची कचराकोंडी होईल, असे विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
महापालिकेच्या वतीने शहरामध्ये दैनंदिन झाडनकाम करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचाºयांची नियुक्ती केली जाते. या कर्मचाºयांची नियुक्ती करण्यासाठी दर वर्षी प्रशासनाकडून टेंडर काढले जाते. त्यानंतर ठेकेदारामार्फत हे कर्मचारी नियुक्ती केले जाते; परंतु सफाई कर्मचाºयांच्या टेंडरची मुदत संपली असून, गेल्या चार महिन्यांपासून या कर्मचाºयांना पगारच मिळालेला नाही. यामध्ये पुन्हा टेंडर मिळेल, या अपेक्षेन अनेक ठिकाणी संबंधित ठेकेदारांकडून काम सुरू ठेवले आहे; परंतु आता चार-चार महिने
पगार मिळत नसल्याने सफाई कर्मचाºयांनी काम थांबविले असल्याचे तुपे यांनी सांगितले. शहरामध्ये कोथरूडसह सर्वच भागात ही परिस्थिती असल्याचे नगरसेवकांनी सांगितले. यावर सफाई कर्मचाºयांची टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये स्वतंत्रपणे टेंडर काढण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच नव्याने कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात येईल. तोपर्यंत काही ठिकाणी अडचण असले तर महापालिकेच्या वतीने सफाईची सोय करण्यात येईल, असे प्रभारी आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
डीबीटीबाबत स्थायी समितीच्या निर्णयानंतरच चर्चा
विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य वाटपासाठी राबविण्यात येत असलेल्या डीबीटी योजनेबाबत सध्या सुरू असलेल्या गोंधळाबाबत नगरसेवकांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला. शाळा सुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना अद्याप डीबीटीचा घोळ मिटला नसल्याचे सांगत, सदस्यांनी यंदा तरी विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळणार का, प्रश्न उपस्थित केला. यावर महापौर मुक्ता टिळक यांनी डीबीटीबाबत अद्याप स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय झाला नसून, स्थायी समितीच्या निर्णयानंतर मुख्यसभेत या विषयावर चर्चा करण्यात येईल, असे स्पष्ट केले.