गेल्या वर्षी शहरात झाले सुमारे ७९ खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:13 AM2021-09-21T04:13:54+5:302021-09-21T04:13:54+5:30

स्टार ११९७ पुणे : गतवर्षी लॉकडाऊन असल्याने सुमारे ४ महिने गुन्ह्यांचे प्रमाण अतिशय कमी झाले होते. तरीही वर्षभराचा विचार ...

There were about 79 murders in the city last year | गेल्या वर्षी शहरात झाले सुमारे ७९ खून

गेल्या वर्षी शहरात झाले सुमारे ७९ खून

Next

स्टार ११९७

पुणे : गतवर्षी लॉकडाऊन असल्याने सुमारे ४ महिने गुन्ह्यांचे प्रमाण अतिशय कमी झाले होते. तरीही वर्षभराचा विचार करता २०१८, २०१९ पेक्षा २०२० मध्ये खुनाच्या घटना अधिक घडल्या आहेत. २०१८ मध्ये पुणे शहरात ७३ खुनाच्या घटना घडल्या होत्या. तर २०१९ मध्ये ७४ खून झाले होते. गतवर्षी २०२० मध्ये ७९ खुनाच्या घटना घडल्या आहेत.

त्यावेळी महिलांविषयक गुन्ह्यांमध्ये मागील ३ वर्षात घट होताना दिसत आहे. २०१८मध्ये १४८१ गुन्हे घडले होते. त्यानंतर २०१९ मध्ये १३९० आणि २०२० मध्ये १०५५ महिलांविषयक गुन्हे दाखल झाले होते.

नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरोने नुकताच २०२० चा गुन्हेविषयक अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार अनेक घटकांमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे.

.....

२०२० मधील पुण्यातील गुन्हे

खून - ७९

खुनाचा प्रयत्न - ११९

अपहरण - ४३५

जबरी चोरी - ७६

बलात्कार ६२

महिलांचा छळ - २५२

मुलांबाबतचे गुन्हे - २१७

महिलांचा विनयभंग - १३४

माहिती तंत्रज्ञान गुन्हे - ९०

विश्वासघात/फसवणूक - ४०४

...

८२ टक्के अल्पवयीन लागला शोध

अपहरणांच्या गुन्ह्यांमध्ये गेल्या २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये वाढ झाली होती; मात्र २०२० मध्ये घट होताना दिसून आली. २०२० मध्ये ४३५ मुलांच्या अपहरणाचे गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी ३६१ जणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले.

.........

लॉकडाऊनमुळे घटले गुन्हे

गतवर्षी जवळपास ४ महिने लॉकडाऊन होता. त्यात संपूर्ण व्यवहार बंद होते. नागरिक घरात बंदिस्त झाले होते. २४ तास रस्त्यावर पोलीस व नागरिक घरात यामुळे चोरी, घरफोडी, वाहन चोरी यासारखे मालमत्तेच्या गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे.

Web Title: There were about 79 murders in the city last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.