चहाप्रेमी पुणेकरांचे हे अाहेत अावडीचे पाच टी स्पाॅट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 08:11 PM2018-03-21T20:11:04+5:302018-03-22T14:12:14+5:30
चहा अाणि पुणेकर हे समिकरण अापल्याला नेहमीच पाहायला मिळते. गप्पांचा फड असाे की एखादी मिटींग, चहा हा साेबतीला हवाच. पुण्यात अनेक फेमस चहा स्पाॅट असून पुणेकरांची माेठी गर्दी येथे पाहायला मिळते.
पुणे : नुकताच पुण्यातील येवले टी हाऊसची चर्चा जगभर झाली. पुणेकरांचे चहाप्रेम यानिमित्ताने समोर आले. पुणेकर आणि चहा हे जणू समीकरणच तयार झाले आहे. पुण्यात अजूनही जुन्या पद्धतीची अनेक अमृतुल्य जागोजागी पाहायला मिळतात. चहाला एकप्रकारे अमृताची उपमा दिलेली पुण्यात पाहायला मिळते. उन्हाळ्यातही चहा हा पुणेकरांना लागताेच. तेव्हा तुम्हाला अस्सल पुणेरी चहाची चव घ्यायची असेल तर तुम्ही खालील पाच फेमस टी स्टॉलला भेट द्यायलाच हवी.
डेक्कनचा लेमन टी
फग्युर्सन रोडवरील रानडे इन्स्टिट्युटच्या शेजारच्या गल्लीत अप्रतिम लेमन टी मिळतो. विद्यार्थ्यांच्या आवडीचा असा हा स्पॉट आहे. त्याचबरोबर ज्यांना दुधाचा चहा आवडत नाही त्यांच्यासाठी हा चहा एक पर्वनीच असतो. येथील चहावाले काका चहाच्या कपात लिंबाचं पानही टाकतात. त्यामुळे या चहाला एक वेगळेच रुप प्राप्त होते.
कमला नेहरु पार्कचा बासुंदी चहा
पुण्यातील कमला नेहरु पार्क येथील या चहाची एक वेगळी ओळख आहे. या चहाला बासुंदी चहा म्हणून संबोधले जाते. ज्यांना गोड चहा आवडतो त्यांनी हा चहा एकदा ट्राय करायला हवा. या चहाचा रंगही आपल्या सामान्य चहापेक्षा वेगळा असतो. पिणाऱ्याला बासुंदीचा फिल हा चहा देऊन जातो.
तोरणा टी हाऊस
नारायण पेठेतील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांचा व नोकरदारांचा हा आवडता चहा आहे. या चहाची चवच निराळी आहे. थोडा मसाला चहा सारखी चव असल्याने तो अनेकांच्या पसंतीचा आहे. सकाळी व संध्याकाळच्या वेळी येथे मोठी गर्दी असते. येथे मिळणारे बिस्किटही उत्तम असते.
शनिवार पेठेतील वैजनाथ अमृततुल्य
येथील अद्रक चहा खूप फेमस आहे. चहासाठी येथे मोठी गर्दी असते. अनेकजण आवर्जुन शनिवार पेठेत आल्यावर वैजनाथचा चहा ट्राय करतात.
जय भोलेनाथ टी हाऊस
पत्र्या मारुती चौकातील या चहाची वेगळीच खासीयत आहे. एकतर हा चहा इतर ठिकाणांपेक्षा कमी पैशात मिळतो. आणि दुसरी म्हणजे, या चहाची सर्वीस तुम्ही रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला उभे असाल तरी मिळते. दिवसभर विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ हा चहा पिण्यासाठी असते. तुम्हाला आलेली मर्गळ झटकायची असेल तर या चहाचा घाेट तुम्ही घ्यायला हवा.