अपंगत्वावर मात करुनी ‘त्यांनी ’ जिंकले क्रिकेटचे मैदान आणि प्रेक्षकांची मने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 07:42 PM2018-12-03T19:42:53+5:302018-12-03T20:06:59+5:30

आपल्या देशात क्रिकेट या खेळाला सर्वोत्तम स्थान देण्यात आले आहे. अपंगत्वावर मात करून क्रिकेट खेळण्याची इच्छा या दिव्यांग लोकांमध्ये दिसून येते.

'They' won the playground and the heart of audience | अपंगत्वावर मात करुनी ‘त्यांनी ’ जिंकले क्रिकेटचे मैदान आणि प्रेक्षकांची मने 

अपंगत्वावर मात करुनी ‘त्यांनी ’ जिंकले क्रिकेटचे मैदान आणि प्रेक्षकांची मने 

googlenewsNext
ठळक मुद्देपुणे माजी महापौर चषक स्पर्धेर्चे हे पहिले वर्ष

पुणे:  अपंगत्व म्हणजे ओंजळीत मिळालेली एक अलगद आणि थोडी वेदनादायी भेट.. पण ही भेट कधी त्यांची समस्सा झालीच नाही तर नेहमी ताकद आणि प्रेरणास्थान बनली. यातून त्यांनी अनेक आव्हानांना लीलया पार करत क्रिकेटच्या खेळात घट्ट पाय रोवत यशाचे मैदान तर जिंकलेच पण प्रेक्षकांची मनेही अगदी दिमाखात जिंकले. 
 पॅराअ‍ॅथेलेटिक्स असोसिएशन आॅफ महाराष्ट्र आणि दिव्यांग क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अपंग दिनानिमित्त पुणे माजी महापौर चषक दिव्यांग पुरुष आणि महिला विभागीय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे जवाहरलाल नेहरु स्टेडियम स्वारगेट येथे आयोजन करण्यात आले होते. आपले अपंगत्व बाजूला ठेवून  दिव्यांग मुले क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाली. पुणे माजी महापौर चषक स्पर्धेर्चे हे पहिले वर्ष आहे. दिव्यांग पुरुष विभागामध्ये महाराष्ट्र राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, अहमदनगर, सांगली, रायगड, बुलढाणा, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, जळगाव, सोलापूर, नांदेड, उस्मानाबाद या १५ जिल्ह्यातून पुरुष संधाची निवड करण्यात आली. दिव्यांग महिला विभागामध्ये गुजरात, महाराष्ट्र, झारखंड, या राज्यातून महिला निवडून संघ तयार करण्यात आले. ११ नोव्हेंबर रोजी कटारिया क्रीडांगण येथे दिव्यांग पुरुष आणि महिला यांची निवड करण्यासाठी क्रिकेट कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. पुणे माजी महापौर चषक स्पधेर्चे उदघाटन माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, दत्तात्रय धनकवडे, माजी उपमहापौर दिलीप बराटे, समाजसेवक बाबा आढाव, उद्योजक युवराज ढमाले आदी उपस्थित होते.

पुरुष विभागातून महाराष्ट्र (अ), महाराष्ट्र (इ), महाराष्ट्र (उ) असे संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. महिला विभागातून महाराष्ट्र, गुजरात, झारखंड असे संघ सहभागी झाले होते. दिव्यांग राष्ट्रीय खेळाडू राजू मुजावर यांच्या नेतृत्वाखाली या संघाची निवड करण्यात आली. पुणे माजी महापौर चषक स्पर्धेत खेळणाऱ्या दिव्यांग लोकांची इतर स्पर्धांसाठी निवड करण्यात येणार आहे. पुरुष विभागाची जम्मू काश्मीर येथे फेब्रुवारीत होणाऱ्या  जम्मू काश्मीर विरुद्ध महाराष्ट्र या सामन्यासाठी निवड होणार आहे. तर महिला विभागाची लखनऊ येथे होणाऱ्या दिव्यांग महिला देशस्तरीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे. मुजावर म्हणाले,दिव्यांग लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. पण त्यांच्या अपंगत्वाकडे पाहून त्यांना बऱ्याच गोष्टींपासून वंचित रहावे लागते. आपल्या देशात क्रिकेट या खेळाला सर्वोत्तम स्थान देण्यात आले आहे. अपंगत्ववर मात करून क्रिकेट खेळण्याची इच्छा या दिव्यांग लोकांमध्ये दिसून येते. आपल्या शरीराच्या अपंगत्वावर मात करून हे लोक खेळण्याचे धाडस दाखवत आहेत. ही कौतुकाची गोष्ट आहे. अनेक दिव्यांग सद्यस्थितीत रोजगार मिळवत आहेत. परंतु या खेळासाठी त्यांना शासकीय मानधन मिळावे.तसेच या दिव्यांग लोकांना पॅराआॅलिम्पिक क्रिकेटमध्ये स्थान मिळावे. 
...................................................................................................
आमच्या झारखंडच्या संघात सर्व मुलींचे वय २५ वर्षांपेक्षा कमी आहे. या स्पधेर्साठी गेली चार महिने सराव करत आहोत. कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता सर्व मुली अतिशय उत्साहाने क्रिकेटचा आनंद घेतात. झारखंड संघाची कर्णधार सेरोफिना मिंज ही सर्वोत्तम कामगिरी निभावत आहे. गरिमा सिंग, प्रशिक्षक झारखंड संघ
...................................................................................................
 गरीब परिस्थितीतून क्रिकेट खेळण्याची जिद्द 
चांगदेव शिरतर हा खेळाडू  महाराष्ट्र (उ) संधातील आहे.त्याचा एक हात आणि पायाला अपंगत्व आले असून क्रिकेट खेळण्याची जिद्द दाखवली आहे. जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे ते वास्तव्याला आहे. गेली पाच ते सहा वर्षे क्रिकेट खेळत आहे. एक उत्कृष्ट खेळाडू असून मुजावर सरांच्या मार्गदर्शनाखाली बक्षिसे मिळवली आहेत. तर अनेक ठिकाणी मॅन आॅफ द मॅच मिळवली आहे. आता झालेल्या सृजन चषक स्पर्धेत १२ चेंडूत ३० धावांचा विक्रम केला आहे. कुटुंबात आई वडील भाऊ असा परिवार आहे. वडिलांकडून कुटुंबासाठी अजिबात आर्थिक  साहाय्य होत नाही. आई कॅन्टीन चालवत.े त्यावर पूर्ण कुटुंबाचा सांभाळ होतो. एवढ्या गरीब परिस्थितीत सुद्धा क्रिकेट खेळण्याची जिद्द दाखवली आहे. 


..................................................................................................
उत्तम चौगुले यांचे वय ३९ वर्ष आहे. पुणे महापौर चषक स्पर्धेत महाराष्ट्र (अ) या संधातून खेळत आहेत. या दिव्यांगपणाला सामोरे जाऊन गेली १३ वर्षे म्हणजेच शाळेत असल्यापासून क्रिकेट खेळत आहेत. कोल्हापूर येथील उजगाव येथे ते वास्तव्यास आहेत. उजगाव याठिकाणी वाहन दुरुस्तीचे काम करून कुटुंब चालवतात. उत्तम चौगुले यांच्या कुटुंबात त्यांची दिव्यांग पत्नी, मुलगा आणि भाऊ असा परिवार आहे.
...................................................................................................

बाळू कोहदी सांगली जिल्ह्यात वास्तव्यास आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र (अ) संघातून खेळत आहेत. बाळू यांचे वय ३४ वर्ष आहे. ते टेलर काम करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करतात. कुटुंबात आई वडील  व ते असा परिवार आहे. एक पाय आणि काठीचा आधार घेऊन या खेळासाठी आपली जिद्द दाखवली आहे.

...................................................................................................

Web Title: 'They' won the playground and the heart of audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे