पुणे : शहरातील बहुचर्चित २४ तास पाणी पुरवठा योजनेसाठी महापालिकेने कर्ज रोखे घेतले होते. मात्र मुंबई शेअर बाजारात ( बीएसई )आवश्यक माहिती दाखल करताना हिशोबाचा डेटा करप्ट झाल्यावरुन सर्वसाधारण सभेत प्रशासनाला सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. या डेटा करप्ट प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, काही खाजगी व्यक्तींसाठी हा प्रकार झाल्याचे देखील काही सदस्यांनी सांगितले. दरम्यान सर्व सदस्यांची तीव्र भावना लक्षात घेत डेटा करप्टची चौकशी आयुक्तांनी थर्ड पार्टी चौकशी करावी. चौकशी पूर्ण होई पर्यंत या विभागाचे काम पाहण्यासाठी कोणताही हस्तक्षेप करु नये असे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी सभागृहात दिले. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधीपक्षनेते चेतन तुपे यांनी डेटा करप्टचा विषय उपस्थित केला. आयटी हब असलेल्या व संगणक प्रणालीसाठी अनेक पुरस्कार घेतलेल्या पुणे महापालिकेचा डाटा करप्ट होणे ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. देशात कर्ज रोखे घेणारी पहिली महापालिका म्हणुन पंतप्रधान, मुख्यमंत्री यांनी गौरव केला. महापालिकेला या प्रकरणी ए पल्स दर्जाचे रेटिंग मिळाले. त्याचाच डेटा गायब होतो. हा एक प्रकारे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा विश्वास घात केल्यासारखे आहे अशी टिका करण्यात आली. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी स्थायी समितीने सर्व्हरसाठी पैसे देण्यास निधी मंजुरी दिली होती. सुरवातीला ६० लाख रुपये खर्च आला. नंतर हा खर्च ३० लाखांनी वाढला. त्यासाठी स्थायी समितीची मान्यता का घेतली नाही असा खडा सवाल केला. महापालिकेच्या संगणक विभागाचे अधिकारी राहुल जगताप यांना या प्रकरणी निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर जगताप यांची चौकशी कोण करणार, कारण या प्रकरणात महापालिकेतील वरिष्ठही सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला. टेडा करप्ट झाला म्हणून अनेक कामांच्या दोन वेळा जाहिराती देऊन टेंडर काढण्यात आल्याचे सदस्य गफुर पठाण यांनी सांगितले. महापालिकेचा डेटा नाशिकमधील एका खाजगी वंष्ठपनीला देणे गंभीर बाब आहे. या प्रकरणात सदस्या मंजुश्री नागपुरे, राणी भोसले, पल्लवी जावळे, दत्तात्रय धनकवडे, गोपाळ चिंतल, अविनाश बागवे, भैय्यासाहेब जाधव, योगेश ससाणे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे , सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, यांनी या बाबत विविध मुददे उपस्थित केले. अखेर या डेटा करप्टची चौकशी आयुक्तांनी तांत्रिक संस्थेच्या माध्यमातुन करावी. तो पर्यत या विभागाचे काम पाहणाठयांनी त्या हस्तक्षेप करु नये असे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी दिले.
महापालिकेच्या डेटा करप्टची ‘थर्ड’ पार्टी चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 9:23 PM
मुंबई शेअर बाजारात ( बीएसई )आवश्यक माहिती दाखल करताना हिशोबाचा डेटा करप्ट झाल्यावरुन सर्वसाधारण सभेत प्रशासनाला सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
ठळक मुद्देसर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय सदस्यांकडून प्रशासन धारेवर डेटा करप्ट प्रकरणात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप