मेट्रोच्या ठेकेदाराला तीस हजार रुपयांचा दंड : कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाने केली कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 07:34 PM2019-07-18T19:34:27+5:302019-07-18T19:37:13+5:30

काम्या जागेवर व सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या कचर्‍यामध्ये हात घालून नागरिकांच्या पत्त्याची शोध मोहीम राबवली. 

Thirty thousand rupees fine for Metro contractor | मेट्रोच्या ठेकेदाराला तीस हजार रुपयांचा दंड : कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाने केली कारवाई 

मेट्रोच्या ठेकेदाराला तीस हजार रुपयांचा दंड : कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाने केली कारवाई 

Next

पुणे :कोथरूड बावधन महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्रमांक १०, ११, १२ मध्ये "स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण मिशन २०२०" अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने विशेषतः डहाणूकर कॉलनी व कोथरूड गावठाण परिसरातील रिकाम्या जागेवर व सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या कचर्‍यामध्ये हात घालून नागरिकांच्या पत्त्याची शोध मोहीम राबवली. 

 यावेळी टाकलेल्या कचर्‍यामध्ये  पत्ता शोधून सात सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर शौचास व लघूशंकेस बसणारे, राडारोडा टाकणे,कचरा जाळणे, वर्गीकरण न करणे, मेट्रोच्या ठेकेदाराने लोखंडी व त्यांच्या कामासाठी लागणारे साहित्य विस्कळीतपणे रस्त्यावर फेकून घाण करणे, तेथील कामे करणाऱ्या कामगारांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून दिली नाही तसेच बांधकाम व्यावसायिकांचे रस्त्यावर पडलेले अस्ताव्यस्त पडलेल्या साहित्यामुळे वाहतुकीस व पदपथावर चालणाऱ्या नागरिकांना आरोग्यविषयक डचणी निर्माण करणाऱ्या मेट्रोच्या ठेकेदाराकडून तीस हजार रुपये (३०,०००/- रूपये) शुल्क वसूल करण्यात आले
 तसेच आरोग्य विघातक परिस्थिती निर्माण करणाऱ्या १४८ नागरिकांवर धडक  कारवाई करून बत्तीस हजार दोनशे रूपये  (३२,२००/-)  असे एकूण पंधरा दिवसात तब्बल ६४,२००/- रूपये शुल्क वसूल करून कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाने विक्रमी दंडात्मक कारवाई करण्यात यश मिळविले. सदर कारवाई कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त मा. शिशीर बहुलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरिक्षक मा. राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरीक्षक श्री. वैभव घटकांबळे, शिवाजी गायकवाड, सचिन लोहकरे, महेश लकारे, संतोष ताटकर, नवनाथ मोकाशी, सतीश बनसोडे, प्रमोद चव्हाण, गणेश साठे, मोकादम वैजीनाथ गायकवाड, अण्णा ढावरे, अशोक खुडे, साईनाथ तेलंगी, अशोक कांबळे इत्यादी या पथकाद्वारे दंडात्मक कारवाई करून कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय हे संपूर्ण कंटेनर मुक्त करण्यात आले.

Web Title: Thirty thousand rupees fine for Metro contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.