पुणे- सोलापूर महामार्गाच्या दुतर्फा काटेरी झुडपे आली होती. रस्ता व्यापला गेला आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही काटेरी झुडपे लागत असत. मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली असताना बांधकाम विभागाने ती काढली नसल्याने प्रवाशांना प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. प्रवाशांना इजा होत असून यामुळे अनेक लहानमोठे अपघात झाले होते. यासाठी संबधित विभागाने तातडीने काटेरी झुडपे काढून रस्ता मोकळा करण्यात यावा, अशी मागणी अनेक वेळा करण्यात आली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत होतेे. कवडीपाट टोलनाका सुरू असताना टोल वसूल करणारी संबंधित कंपनी साफसफाई करत असे. परंतु आता टोलवसुली बंद झाली आहे. त्यामुळे रस्त्याची देखभाल-दुरुस्ती होत नाही. सदर रस्ता आता सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मालकीचा आहे. परंतु शासनाचे हे दोन्ही विभागांचे या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली होती.
सदर बाब लक्षात आल्यानंतर हवेली तालुका पत्रकार संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत, पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने झुडपे तोडण्यात आली.
या वेळी मधुबन मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने ६० गरजूंना पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या हस्ते मोफत कपडे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, हवेली पंचायत समिती सदस्य अनिल टिळेकर, डाॅ. अभय नलावडे, प्रभाकर क्षीरसागर, राजेंद्र काळभोर, संदीप बोडके, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन हभप सचिन महाराज माथेफोड यांनी, तर उपस्थितांचे आभार राजेंद्र हजगुडे यांनी मानले.
--
फोटो क्रमांक : १४ लोणीकाळभोर झाडे तोडली
फोटो - झाडे असताना व तोडल्यानंतरचा महामार्ग.