राजू इनामदारपुणे : महापालिकेची जलवाहिनी व घरात आलेली ग्राहकाची जलवाहिनी यांच्याबरोबर मध्ये समान पाणी योजनेतील पाणी मोजणारे मीटर बसविणार आहेत. डिजिटल आकडे असणाऱ्या या मीटरमध्ये संवेदक बसवले आहेत. थोडेही पाणी महापालिकेच्या वाहिनीतून ग्राहकाच्या वाहिनीत आले, की या मीटरमध्ये त्याची त्वरित नोंद होईल. मीटर बसल्यानंतर ग्राहकांना दरमहा बिल येईल. यामध्ये हजार लिटरला ७ रुपये आकारण्यात येणार आहेत.
समान पाणी योजनेअंतर्गत (२४ तास पाणी) एकूण ३ लाख २५ हजार मीटरची मागणी नोंदवण्यात आली आहे. त्याचा खर्च ६०० कोटी रुपये आहे. तो योजनेच्या २ हजार १०० कोटी रुपयांमध्येच गृहित धरण्यात आला आहे. ही कंपनी जर्मनीची असून तिथूनच पुण्यात मीटर येणार आहेत. पहिला टप्पा नोव्हेंबरअखेर जर्मनीहून पुण्यात येत आहे. डिसेंबरअखेर शहरातील व्यावसायिक वापराच्या ४५ हजार व्यावसायिक नळजोडांना हे मीटर बसवले जातील. त्यांच्याकडून या मीटरचे पैसे वसूल केले जाणार असले तरी घरगुती ग्राहकांना मात्र पैसे द्यावे लागणार नाहीत. त्यांना मीटर विनामूल्य बसवून मिळतील. मात्र वापरलेल्या पाण्याचे पैसे दरमहा जमा करावे लागतील. आतापर्यंत ग्राहकांना पाणीपट्टी जमा करावी लागत होती. ती वार्षिक असे. आता हे मीटर बसल्यानंतर मात्र ग्राहकांना वीज मंडळाचे येते त्याप्रमाणे पाण्याचेही दरमहा बिल येणार आहे. व्यावसायिक व घरगुती आकार वेगवेगळा असणार आहे. पाणीपट्टी व पाण्याचे दरमहा बिल यात फारशी तफावत असणार नाही, असे पाणीपुरवठा विभागातील अधिकाºयांनी सांगितले. राष्ट्रीय जलप्राधिकरणाच्या निकषांप्रमाणे माणशी १५० लिटर पाणी दिले जाईल. त्याचा दर साधारण हजार लिटरसाठी ७ रुपये घरगुती असा असेल. मात्र त्यापुढे वापर होत असेल तर त्या प्रत्येक लिटरसाठी वेगळा दर असेल. किती हजार लिटर पाणी वापरले जाते त्यावर ही आकारणी असेल. त्यासाठी विशिष्ट लिटरचा स्लॅब असेल. त्यापुढे वापर झाला, की दरातही बदल होईल. बिल आले, की ते जमा करण्यासाठी मुदत असेल. त्या मुदतीच्या आत बिल जमा केले नाही तर पाणी बंद करण्यात येईल. थकबाकीवर दंडही आकारला जाईल. व्यावसायिक वापरासाठीचे दरही सध्या आहेत त्यापेक्षा जास्त नसतील, असे पाणीपुरवठा अधिकाºयांचे म्हणणे आहे. या दरांमध्ये दरवर्षी बदलही केले जातील.सर्व मीटरना संवेदक बसविणारमीटरचा आकार नळजोडाच्या आकारानुसार कमी जात होणार आहे. मीटर ग्राहकांच्या सांगण्यानुसार त्याच्या सोयीच्या ठिकाणीव त्यावरच्या नोंदी घेणे कर्मचाºयाला सुलभ होईल, अशा ठिकाणीबसवले जाईल.४शहरातील सर्व नळजोडांना हे मीटर टप्प्याटप्प्याने बसवले जाणार आहेत. मीटरमध्ये संवेदक बसवले असल्याने त्यात कोणीही थोडीसुद्धा छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, तर त्याची माहिती त्वरित प्रशासनाला समजणार आहे.समान पाणी योजनाल्ल ३ लाख २५ हजार मीटरल्ल खर्च ६०० कोटी रुपयेल्ल एकूण योजनेचा खर्च २ हजार १०० कोटील्ल व्यावसायिकांना ४५ हजार मीटरल्ल मीटर विनामूल्य मिळणारल्ल दरमाणशी १५० लिटर पाणील्ल हजार लिटरसाठी ७ रुपये दर