हवेलीत तीन व मंचर, माळेगावची निवडणूक होणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:12 AM2020-12-24T04:12:22+5:302020-12-24T04:12:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यातील ७४६ ग्रामपंचायतींसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होत असून, उमेवारी अर्ज दाखल करण्यास ...

Three elections will be held in Haveli and Manchar, Malegaon | हवेलीत तीन व मंचर, माळेगावची निवडणूक होणारच

हवेलीत तीन व मंचर, माळेगावची निवडणूक होणारच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यातील ७४६ ग्रामपंचायतींसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होत असून, उमेवारी अर्ज दाखल करण्यास बुधवार (दि. २३) डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे. हवेली तालुक्यातील शेवाळवाडी, औताडे-हंडेवाडी आणि वडाचीवाडी या तीन ग्रामपंचायतीचा पुणे महापालिकेत समाविष्ट करण्याबाबत तर बारामती तालुक्यातील माळेगाव आणि आंबेगाव तालुक्यातील मंचर ग्रामपंचायतीच्या नगरपरिषद करण्याबाबत शासनाने प्राथमिक अद्यादेश काढला असला तरी अद्याप अंतिम निर्णय न झाल्याने या पाचही ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणारच असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

पुणे शहरालगतची २३ गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यासंदर्भात शासन स्तरावर जोरदार हलचाली सुरू होत्या, त्यानुसार बुधवारी अद्यादेश देखील काढले. परंतु या संदर्भात अंतिम आदेश झालेला नाही. या २३ गावांपैकी हवेली तालुक्यातील शेवाळवाडी, औताडे-हंडेवाडी आणि वडाचीवाडी या तीन ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे. तसेच बारामती तालुक्यातील माळेगाव आणि आंबेगाव तालुक्यातील मंचर ग्रामपंचायतीच्या नगरपरिषद होणार आहे. परंतु, अद्याप या पाचही ग्रामपंचायती संदर्भात शासनाकडून कोणतेही स्पष्ट आदेश आले नाहीत. यामुळे या पाचही ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार निवडणुका घेण्यात येणार आहेत.

Web Title: Three elections will be held in Haveli and Manchar, Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.