पुणे : नागरिकांना केंद्रीभूत मानून, त्यांच्या कल्पना, अभिप्राय जाणून घेणाऱ्या तीन डिजिटल सेवांचे महापालिकेच्या वतीने शुक्रवारी(दि.२३) सकाळी ११ वाजता उद््घाटन होत आहे. यापैकी एका सेवेतून नागरिकांना महापालिकेच्या सुरू असलेल्या सर्व प्रकल्पांची माहिती मिळेल व त्यावर आपले मतही नोंदवता येईल. महापौर मुक्ता टिळक यांनी ही माहिती दिली. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, महापालिका आयुक्त कुणाल कुमार यावेळी उपस्थित होते.पीएमसी केअर हे संकेतस्थळ महापालिकेने सन २०१५ च्या अखेरीस सुरू केले होते. त्यावर आतापर्यंत ८० हजार नागरिकांनी तक्रारी केल्या, त्यातील ९८ टक्के तक्रारींचा निपटारा करण्यात आला. आता त्याचाच पुढील भाग तयार करण्यात आला असून त्यातून नागरिकांना महापालिकेकडून मिळणारे सर्व प्रकारचे दाखले घरबसल्या मिळतील. सर्व प्रकारचे कर जमा करता येतील. दुसºया जीआयएस या सिस्टिममध्ये नागरिकांना संकेतस्थळावरून महापालिकेच्या सर्व प्रकारच्या प्रकल्पांची माहिती मिळेल. विविध विभागांची माहिती समजेल. अत्यावश्यक सेवांचे क्रमांक मिळतील. यातच एक पान स्वत: विकसित करून त्यावर नागरिकांना आपली मतेही मांडता येतील. नव्या कल्पना सूचवता येतील. विविध उपक्रमांमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होता येईल. त्यांच्या सूचनांचा विचार होईल.महापालिका आता ई-लर्निंग सुरू करत आहे. त्यात व्हर्च्युअल क्लासरूम असतील. ८६१ डिजिटल क्लासरूम असणार आहेत. प्रत्येक शाळेला इंटरनेट सुविधा मिळणार आहे. शाळा व्यवस्थापनाचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात येणार आहे. तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येईल. येत्या जून २०१८ पासून किमान १०० शाळांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येईल, अशी माहिती यावेळी पदाधिकाºयांनी दिली. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर येथे शुक्रवारी सकाळी ११ वाजता या सेवांचे उद््घाटन होईल.
महापालिकेच्या तीन सेवांना शुक्रवारी सुरुवात, नागरिक केंद्रीभूत सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 3:18 AM