होर्डिंग कापणाऱ्या तीन कामगारांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 01:29 AM2018-11-14T01:29:32+5:302018-11-14T01:29:57+5:30
खंडणीविरोधी पथकाची कामगिरी : अपघातानंतर महिनाभर होते फरार
पुणे : होर्डिंग काढताना ते कोसळून झालेल्या अपघात गेल्या महिन्याभरापासून फरार असलेल्या होर्डिंग कापणाºया तिघांना पकडण्यात खंडणीविरोधी पथकाला यश मिळाले आहे़ रामदास सरोदे (रा. आष्टी), धनंजय भोळे (रा. बार्शी) आणि देवदास कोठारी (रा.लोहार, छत्तीसगड) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी आतापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली असून ठेकेदार मल्लिकार्जुन अजून फरार आहे.
जुना बाजार येथील शाहीर अमर शेख चौकात ५ आॅक्टोबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास झालेल्या रेल्वेच्या हद्दीतील मोठे होर्डिंग पडून त्याखाली सापडल्याने चार जणांचा मृत्यू झाला होता़ याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी रेल्वे अभियंता संजयसिंग विष्णुदेव (वय ४२, रा. विकासनगर, देहूरोड) आणि त्याच्या सहकारी पांडुरंग निवृत्ती वनारे (वय ५७, रा. कसबा पेठ) व त्यानंतर कॅप्शन अॅडव्हर्टायझिंग कंपनीचा मालक अब्दुल रज्जाक महम्मद खालिद फकिह (वय ५४, रा. अर्जुन मनसुखानी पथ, कोरेगाव रस्ता) यांना अटक केली होती़
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांच्या सूचनेनुसार मिळालेल्या माहितीनुसार घुगे व त्यांचे सहकारी हडपसर येथील वैभव टॉकीजसमोर गेले़ तेथे तिघे जण संशयास्पदरीत्या थांबलेले दिसून आले़ पोलिसांनी त्यांना घेरून ताब्यात घेतले़ त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हा कबूल केला़ तिघांना बंडगार्डन पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे़
याप्रकरणी निष्काळजीपणा दाखविल्याने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या घटनेनंतर होर्डिंग कोसळताना ते कापत असलेले तीनही कामगार पळून गेले होते़ खंडणीविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल घुगे व त्यांचे सहकारी हडपसर पोलीस ठाण्याच्या परिसरात १२ नोव्हेंबरला गस्त घालत होते़ त्यावेळी पोलीस हवालदार काळभोर यांना या कामगारांविषयी माहिती मिळाली होती़