पुणे : तिहेरी हत्याकांड प्रकरण ; आणखी एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 05:09 AM2018-02-28T05:09:06+5:302018-02-28T05:09:21+5:30
गणेश पेठेतील तिहेरी हत्याकांडातील पुरावा नष्ट केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी सोनवणे याला अटक करून न्यायालयात हजर केले.
पुणे : गणेश पेठेतील तिहेरी हत्याकांडातील पुरावा नष्ट केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी सोनवणे याला अटक करून न्यायालयात हजर केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. डी. मेश्राम यांनी आरोपीला ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, खून करण्यात आलेल्या दोघांची ओळख पटली आहे.
रवींद्र ऊर्फ बाब्या जगन सोनवणे (वय २८, रा. कागदीपुरा, कसबा पेठ) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणात यापूर्वी विक्रम ऊर्फ विकी दीपकसिंग परदेशी (३४, रा. परदेशीवाडा, नाडेगल्ली, पुणे) यालाही अटक करण्यात आली आहे. तो पोलीस कोठडीत आहे. शुक्रवारी (दि. २३) घडलेल्या घटनेत एकूण तीन मृतदेह सापडले. त्यातील दोघांची ओळख पटली आहे. नावेद रफीक शेख (वय १५, रा. नाडेगल्ली, गणेश पेठ) आणि संदीप नारायण वाघ (वय २६, रा. हडपसर) या दोघांची ओळख पटली आहे. अद्याप एकाची ओळख पटणे बाकी आहे. याबाबत नावेद याचे मामा आरीफ कासम शेख (२७) यांनी फरासखाना पोलिसांत फिर्याद दिली आहे. सहायक सरकारी वकील एस. ए. क्षीरसागर यांनी सोनवणे याने रवींद्र आणि मुन्ना शेख नावाच्या साथीदारांसह हा गुन्हा केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानुसार मुन्ना याच्या शोधासाठी तसेच त्यांचे आणखी साथीदार असण्याची शक्यता आहे. याबाबत व मृत्यू झालेल्या तिसºया व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. अधिक तपासासाठी सोनवणे याला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली.
जमिनीच्या वादाप्रकरणी दोघांना अटक
पुणे : जमिनीच्या वादावरून रखवालदाराला मारहाण करीत केलेल्या धान्यचोरीप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. सराफ यांंनी आरोपींना १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. सुनील तुकाराम आव्हाळे (वय ५०) व वाल्मीक आत्माराम सातव (वय ३५, दोघे रा. आव्हाळवाडी) यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, सौरभ सुनील आव्हाळे आणि सुनील आव्हाळे यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ९ जून २०१६ ते १५ नोव्हेंबर २०१७ दरम्यान घडली आहे. दिलीपराज ज्ञानेश्वर भोकरे (वय ४९, रा. सहकारनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आव्हाळवाडी येथे जमीन आहे. तेथे रखवालदार महेंद्र रजपूत यांना राहता यावे म्हणून घर बांधायला घेतले होते. मात्र, आरोपींनी सदर जमीन आमची आहे, असे सांगून केलेले ७५ हजार रुपये किमतीचे बांधकाम पाडले. तसेच वॉचमनला तलवारीचा धाक दाखवून शिवीगाळ करून त्याला मारहाण केली. तसेच आरोपींनी फिर्यादींच्या शेतातील ९० हजार रुपयांची ज्वारी व वॉचमनची सोन्याची साखळीही चोरली.
शोरूममधून साडेचार लाख लांबविले
पुणे : दुचाकीच्या शोरूममधील ४ लाख ५२ हजार ६१० रुपये चोरट्याने चोरून नेले़ ही घटना सोमवारी पहाटे दीड वाजता घडली़ लक्ष्मीकांत इंगळे (वय २९, रा़ टिंगरेनगर, विश्रांतवाडी) यांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ इंगळे यांचे एअरपोर्ट रोडवर एस़ कुदळे सुझुकी शोरूम आहे़ कार्यालयाच्या टेबलच्या खालच्या ड्रॉवरमध्ये रोख रक्कम ठेवली होती़ शोरबमचे मागील उघडे पॅसेजचे उघड्या दरवाजावाटे चोरट्याने मध्यरात्री आत प्रवेश केला़