टपरीधारकांना मिळणार हक्काची जागा

By admin | Published: June 13, 2014 05:25 AM2014-06-13T05:25:20+5:302014-06-13T05:25:20+5:30

अ‍ॅड़ अशोक पवार व नगर परिषद सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांना दिले़ टपरी पुनवर्सनच्या जागेबाबत आज संबंधित विभागाचे फाईलवर स्वाक्षऱ्या केल्या

The title holder will get the right place | टपरीधारकांना मिळणार हक्काची जागा

टपरीधारकांना मिळणार हक्काची जागा

Next

शिरूर : टपरी पुनर्वसन व नगर परिषद प्रशासकीय इमारतीसाठी शासनातर्फे येत्या महिनाभरात नगर परिषदेकडे जागा हस्तांतरित करण्याचे आश्वासन विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी मुंबई येथे आमदार अ‍ॅड़ अशोक पवार व नगर परिषद सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांना दिले़ टपरी पुनवर्सनच्या जागेबाबत आज संबंधित विभागाचे फाईलवर स्वाक्षऱ्या केल्या असून, महसूलमंत्र्यांच्या सहीनंतर जागा नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्यात येईल़
शहरातून जाणाऱ्या पुणे नगर-रस्त्यावरील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी व शहर टपरीमुक्त करण्याच्या हेतूने शहरातील ४५० टपऱ्यांचे अतिक्रमण मागील जूनमध्ये (२०१३) हटवण्यात आले होते़ टपऱ्या हटवल्यानंतर आमदार अ‍ॅड़ पवार व धारिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद प्रशासनाने प्रशासकीय प्रक्रिया राबविली़
यानंतर पवार व धारिवाल यांनी त्याचा वर्षभर नियमित पाठपुरावा केला़ आमदार पवार यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले़ याचा वर्षभरातच सकारात्मक परिणाम जाणवला़ काल (दि. ११) मुंबई येथे वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली़ आमदार पवार, सभागृहनेते धारिवाल यांच्यासह नगरसेवक जाकिरखान पठाण, विजय दुगड, शिक्षणमंडळ सदस्य संतोष शितोळे, मुख्याधिकारी डॉ़ विजयकुमार थोरात, नगरपरिषद अभियंता विवेक देशमुख तसेच संबंधित खात्यांचे सचिव, अधिकारी या बैठकीस उपस्थित होते़
या बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर टपरी पुनर्वसनसाठी शिरूर बसस्थानका शेजारील ४९़९० गुंठे, प्रशासकीय इमारतीसाठी शासकीय वरिष्ठ मुलींच्या वसतिगृहाशेजारी ५९ गुंठे तर अग्निशामक केंद्रासाठी पाबळ रस्त्यावरील २९ गुंठे जागा ३० दिवसांत नगर परिषदेकडे हस्तांतर करण्याबाबत वळसे पाटील यांनी आमदार पवार व धारिवाल यांना आश्वासन दिले़ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार पवार व धारिवाल यांच्या मागणीनुसार नगर परिषद प्रशासकीय इमारतीसाठी पाच कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला असून, जागा ताब्यात मिळताच या कामांना सुरुवात करण्यात येणार आहे.
टपरी पुनवर्सनांतर्गत नियोजित ठिकाणी दुकान केंद्राची उभारणी करण्यात येणार असून, त्याठिकाणी गरजुंना व्यवसायासाठी दुकाने मिळू शकणार आहेत. टपऱ्यांचे अतिक्रमण हटवल्यानंतर वर्षभरातच ही प्रक्रिया मार्गी लागल्याने टपरीधारकांसाठी ही आनंदाची बाब म्हणावी लागेल़ (वार्ताहर)

Web Title: The title holder will get the right place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.