पुणे : महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी शनिवारी (दि. ३) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. यात भाजपाचे संख्याबळ सर्वाधिक असल्याने त्यांचाच अध्यक्ष होणार हे निश्चित आहे. त्यामुळे ज्यांना उमेदवारी मिळेल, त्यालाचा अध्यक्षपद मिळणार हे स्पष्ट आहे. अध्यक्षपदाची माळ आपल्याच गळ्यात पडण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असून, कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.भाजप इच्छुकांमध्ये उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. ज्येष्ठ नगरसेवक सुनील कांबळे, योगेश मुळीक, ज्येष्ठ नगरसेविका रंजना टिळेकर, मंजूषा नागपुरे हे प्रमुख इच्छुक आहेत. त्यात कांबळे हे तब्बल पाच वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. मात्र, त्यांना आतापर्यंत एकही महत्त्वाचे पद मिळालेले नाही. त्यामुळे ते प्रमुख दावेदार आहे.वडगाव शेरीचे आमदार जगदीश मुळीक यांचे बंधू योगेश मुळीक हे स्पर्धेत आहेत. त्यांची नगरसेवकपदाची दुसरी टर्म आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची गणिते लक्षात घेऊन वडगावशेरीत पक्षाला ताकद देण्यासाठी मुळीक यांचा नावाचा विचर होऊ शकतो. याशिवाय पालिकेतील जातीय समीकरणांचा विचार झाल्यास त्यांना फायदेशीर ठरणार आहे.तिसºयांदा टर्म नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आमदार योगेश टिळेकर यांच्या मातोश्री रंजना टिळेकर याही अध्यक्षपदासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांना संधी मिळाल्यास हडपसर मतदारसंघात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी ज्येष्ठ महिला सदस्या म्हणून त्यांच्या नावाचाही पक्षाकडून विचार होऊ शकतो.या स्पर्धेत आणखी एक नाव आयत्या वेळेस पुढे येण्याची शक्यता आहे, ते म्हणजे मंजूषा नागपुरे. दुसरी टर्म नगरसेविका असलेल्या नागपुरे या कार्यक्षम नगरसेविका म्हणून परिचित आहेत, तसेच स्पर्धेतील अन्य तीन नगरसेवक हे मंत्री व आमदारांच्या कुटुंबातील आहेत.त्यामुळे पक्षावरील घराणेशाहीचा शिक्का पुसण्यासाठी नागपुरे यांना अनपेक्षितपणे संधी दिली जाऊ शकते, असे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले. या चार प्रमुख दावेदारांव्यतिरिक्त नीलिमा खाडे या इच्छुक आहेत. मात्र, या सर्वांपैकी पक्ष कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, हे दुपारी तीन वाजता अर्ज भरण्याच्या मुदतीलाच स्पष्ट होऊ शकणार आहे.>७ मार्चला निवडणूकस्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचा कार्यकाळ संपल्याने अध्यक्षपदासाठी निवडणूक होतआहे. त्यासाठी येत्या ७ मार्चला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी ३ मार्चला अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.सद्यस्थितीला १६ सदस्यीय स्थायी समितीत भाजपाचे १० सदस्य असल्याने अध्यक्षपद भाजपाकडेच जाणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे भाजपाकडून ज्या सदस्याला उमेदवारी मिळेल, त्याच्याच गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार असल्याचे स्पष्ट आहे.
स्थायी समिती अध्यक्षपदाचा आज फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 1:13 AM