विद्यार्थ्याच्या निधनामुळे पुणे विद्यापीठातील एम. काॅमचे अाजचे पेपर रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 02:19 PM2018-05-07T14:19:30+5:302018-05-07T14:20:19+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने, अाज विद्यापीठाच्या वाणिज्य विभागात हाेणारे एम काॅमचे दाेन पेपर पुढे ढकलण्यात अाले अाहेत.

todays m.com papers cancelled due to death of student | विद्यार्थ्याच्या निधनामुळे पुणे विद्यापीठातील एम. काॅमचे अाजचे पेपर रद्द

विद्यार्थ्याच्या निधनामुळे पुणे विद्यापीठातील एम. काॅमचे अाजचे पेपर रद्द

googlenewsNext

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहात राहणारा ऋषिकेश अाहेर याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ऋषिकेश हा विद्यापीठाच्या वाणिज्य विभागात दुसऱ्या सत्रात शिकत हाेता. अाजच त्याचा दुसऱ्या सत्रातील पहिला पेपर हाेता. ऋषिकेशच्या अचानाक जाण्याने विद्यार्थ्यांना धक्का बसला असून विद्यार्थ्यांनी एम काॅमचे अाज हाेणारे दाेन पेपर पुढे ढकलण्याची विनंती केली हाेती. कुलगुरुंनी विद्यार्थ्यांची विनंती मान्य करत अाज हाेणारे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे एम काॅमचे दाेन्ही पेपर पुढे ढकलले अाहेत. 
    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतीगृहात राहणाऱ्या ऋषिकेश अाहेर याचे सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अाज सकाळी साडेसहाच्या सुमारास ऋषिकेशला त्रास हाेऊ लागला. ताे अाेरडायला लागल्याने शेजारील विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे धाव घेत सुरक्षा रक्षकांना बाेलावून घेतले. त्यानंतर त्याला विद्यापीठातील अाराेग्य केंद्रात हलविण्यात अाले. परंतु त्याची तब्येत जास्त खालवली असल्याने त्याला ससून रुग्णालयात हलविण्यात अाले. ससूनला त्याला उपचारादरम्यान मृत घाेषित करण्यात अाले. ऋषिकेश हा मुळचा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याचा रहिवासी अाहे. दरम्यान अाज एम काॅमचे दाेन पेपेर हाेणार हाेते. ऋषिकेशच्या अचानक जाण्याने विद्यार्थ्यांना माेठा धक्का बसला हाेता. त्यांनी अाजचे पेपर पुढे ढकलण्याची विनंती केली हाेती. त्यानुसार कुलगुरुंनी अाजचे दाेन्ही पेपर पुढे ढकलले अाहेत. अाजचे पेपर परीक्षा संपल्यावर घेण्यात येणार असून, त्याबाबतची अधिकृत माहिती नंतर देण्यात येईल असे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात अाले अाहे. 

Web Title: todays m.com papers cancelled due to death of student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.