लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : देशातील सर्व व्यापाऱ्यांनी देश-विदेशीतील मोठ्या आणि प्रमुख ई कॉमर्स कंपन्यांच्या विरोधात आवाज उठवला आहे. देशातील व्यापाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या कॉंफेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स (कॅट) तर्फे देशभरात ‘रिटेल डेमोक्रॅसी डे’ निमित्त मंगळवारी (दि. १५) स्थानिक व्यापाऱ्यांचा विरोध कळविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
‘कॅट’चे अध्यक्ष दिलीप कुंभोजकर, उपाध्यक्ष पुष्पा कटारीया, राज्य संघटन मंत्री अजित सेठीया, पूना मर्चंट चेंबरचे माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया आदी यावेळी उपस्थित होते.
ई-कॉमर्स व्यापारासाठी धोरण जाहीर करावे, त्यात योग्य अधिकार असणारी समिती नेमावी, ‘लोकलपासून व्होकल’ हे पंतप्रधानांचे अभियान तळागाळापर्यत पोहचवण्यासाठी व्यापारी आणि शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असणारी राष्ट्रीय समिती नेमावी आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.