पुणे : आजच्या आधूनिक युगात युद्धाचे स्वरूप बदलले आहे. देशाच्या सामुद्र किना-यांचे रक्षण करणा-या युद्धनौकांनाही आण्विक, रासायनिक आणि जैविक हल्याचा धोका आहे. अशा प्रकारचा हल्ला झाल्यास निर्माण होणा-या परिस्थीतीला तोंड देण्यासाठी आणि हल्याची तिव्रता कमी करण्यासाठी नौसेनीक तसेच अधिका-यांना आधूनिक सिम्यूलेटरद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लोणावळा येथील नौदलाचे प्रशिक्षण केेंद्र असलेल्या आयएनएस शिवाजी येथे न्युक्लीअर, बायोलॉजीकल आणि केमीकल वॉरफेर हे नवे केंद्र सुरू करण्यात आले असून संस्थेच्या हिरकहोत्सवी वर्षानिमित्त या नव्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन सोमवारी नौदल प्रमुख अॅडमिरल सुनिल लांबा यांच्या हस्ते करण्यात आले.
हिंदी महासागरात भारतीय नौसेनेचा मोठा दबदबा आहे. समुद्रात देशाची सेवा करणा-या नौकांनाही आण्विक, रासायनिक आणि जैविक शस्त्राद्वारे हल्ला होण्याचा धोका असतो. ही घातक शस्त्रे मोठ्या प्रमाणात माणवी आरोग्यावर परिणाम करतात. देशात नौसेनिकांना या प्रकारचे प्रशिक्षण हे केवळ लेखी स्वरूपात मिळत होते. मात्र, गोवा शिपयार्ड तर्फे ‘अभेद्य’ या नव्या सिम्युलेटरची निर्मिती करण्यात आली असून हे सिम्युलेटर लोणावळा येथील आएएनएस शिवाजी या ठिकाणी कार्यान्वीत करण्यात आले आहे. या द्वारे याप्रकारच्या हल्यांना तोंड अधिकारी आणि नौसिकांना प्रशिक्षीत करण्यात येणार आहे. नौदलातील प्रत्येकाला याचे प्रशिक्षण हे अनिवार्य असून आतापर्यंत सात हजार सैनिकांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. या सिम्युलेटरचे प्रात्यक्षिक यावेळी नौदलाच्या अधिका-यांनी दाखवीले.
यावेळी माध्यमांशी बोलतांना नौदल प्रमुख अॅडमिरल लांबा म्हणाले, भारतीय नौदलातील अधिकारी आणि नौसैनिकांना प्रशिक्षीत करणारी आयएनएस शिवाजी हे महत्वाचे केंद्र आहे. आतापर्यंत या ठिकाणी जहाजावरील आग लागल्यास तसेच मिसाईल द्वारे जहाचे होणारे डॅमेज कंट्रोल कमी करण्यासाठी प्रशिक्षण दिले जात होते. मात्र, जहाजावर आण्विक, रासायनिक आणि जैविक हल्ला झाल्यास त्या पासून करण्यात येणारे बचावात्मक प्रशिक्षण आता या नव्या केंद्रामुळे देण्यात येणार आहे. आशिया खंडात अशा प्रकारचे प्रशिक्षण देणारे हे एकमेव केंद्र आहे. यामुळे देशाची युद्धसज्जता आणखी मजबुत होणार आहे.
आशिया खंडातील एकमेव आधुनिक प्रशिक्षण केंद्र
आण्विक, रासायणीक आणि जैविक हल्याबाबत आतापर्यंत केवळ लेखी स्वरूपात प्रशिक्षण देण्यात होते. मात्र, गोवा शिपयार्डने या आधूनिक सिम्युलेशन यंत्रणा बनवीली आहे. आशिया खंडातील अशा प्रकारचे प्रशिक्षण देणारे हे एकमेव प्रशिक्षण केंद्र आहे. यात हल्यापासून बचाव करण्यासाठी पाच स्वतंत्र कक्षांची निर्मिती करण्यातआली आहे. यात आधूनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. नौदलाच्या प्रत्येक जहाजावर ही यंत्रणा बसविण्यात आली आहे.