सहायक अभियंतावर लाच घेताना जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:00 AM2021-02-05T05:00:45+5:302021-02-05T05:00:45+5:30
पुणे : विद्युत मोटार बसवण्याचे काम करण्यासाठी कोटेशनची कागदपत्रे पाहून धानोरी वीज वितरण विभागातील सहायक अभियंताला ४ हजारांची ...
पुणे : विद्युत मोटार बसवण्याचे काम करण्यासाठी कोटेशनची कागदपत्रे पाहून धानोरी वीज वितरण विभागातील सहायक अभियंताला ४ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.
दीपक विठ्ठल गोंधळेकर (वय ४८) असे या अभियंत्याचे नाव आहे. तक्रारदार यांनी दोन विद्युत मीटर बसवण्याचे काम घेतले होते. त्याचे कोटेशन घेण्यासाठी दीपक गोंधळेकर यांच्या कार्यालयात गेले होते. त्यांनी कोटेशनची कागदपत्रे पाहून तक्रारदार यांच्याकडे ५ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याची पडताळणी करताना गोंधळेकर यांनी ४ हजार रुपये लाच घेण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार तक्रारदाराकडून ४ हजार रुपयांची लाच घेताना गोंधळेकर याला पकडले. पोलीस निरीक्षक सुनील बिले अधिक तपास करीत आहे.