पुणे : एसटी कर्मचा-यांनी सुरू केलेल्या संपाचा खासगी प्रवासी कंपन्यांनी फायदा उचलला असून शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन येथील बसस्थानकाबाहेरच आपली वाहने उभी केली़ एरवी अशा ट्रॅव्हल एजंटला अव्हेरून एसटी बसस्थानकात जाणा-या प्रवाशांना मंगळवारी त्यांच्या मागे मागे जाण्याशिवाय पर्याय उरला नव्हता़ या संपाचा सर्वच प्रवाशांना त्रास झाला असला तरी सवलतीच्या दरात एसटी बसने प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना त्याचा मोठा आर्थिक फटकाही सहन करण्याची वेळ आली़महर्षीनगर : दिवाळीची सुटी सुरू झाल्यामुळे स्वारगेट बसस्थानकात प्रवाशांची नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती़ परंतु संप सुरू असल्यामुळे एकही एसटी बस फलाटावर उभी नव्हती. त्यामुळे काही प्रवाशांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. रात्री प्रवास करून आलेल्या एसटी बस प्रवाशांना बसस्थानकावर उतरवून बस थेट आगारात जात होत्या. संपामुळे खासगी वाहतूकदारांच्या एजंट लोकांना संधीचा फायदा घेत प्रवाशांची लूट सुरू केली. काही प्रवासी घरी जाण्याच्या ओढीने, नाईलाजास्तव खासगी वाहतूकसेवा वापरत होते.या संपाचा सर्वात जास्त मनस्ताप कोल्हापूर, सांगली व सातारा या भागातील प्रवाशांना झाला. बारामती, सातारा येथे स्वारगेट बसस्थानकावरून नॉनस्टॉप गाड्या दर १५ ते ३० मिनिटांनी सोडल्या जातात़ या गाड्यांना आरक्षण करण्याची गरज नसल्याने असंख्य प्रवासी थेट बसस्थानकात येतात़ तेव्हा बहुतांशी वेळा त्यांना तातडीने बस मिळते़ ही सवय असल्याने असंख्य प्रवासी नेहमीप्रमाणे बसस्थानकावर आले़ पण, कोणतीच बस नसल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली़ त्याप्रमाणे सांगली, कोल्हापूर, कोकणात जाणाºया असंख्य प्रवाशांचे हाल झाले़ दिवाळीच्या सुटीमुळे घरी जाणाºया, बाहेरगावांहून शिकायला आलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनादेखील संपाचा मोठा फटका बसला़ काही प्रवासी लहान मुलांना घेऊन देवदर्शनासाठी बाहेर पडले होते़ परंतु मध्यरात्री सुरू झालेल्या संपाची कुठलीही माहिती नसल्यामुळे त्यांना परत आपल्या घराची वाट धरावी लागली. या वेळी सत्ताधारी पक्षाचे कुठलेही आमदार किंवा प्रतिनिधी प्रवाशांची साधी विचारपूसही करण्यासाठी आले नाही व त्यांना कुठलीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली नाही.या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रवाशांची विचारपूस करत, राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाºयांच्या समस्याही जाणून घेतल्या. सुप्रिया सुळे या येथून पुढे दौºयासाठी कोल्हापूरला जाणार होत्या़ त्यांनी कोल्हापूरला जाणाºया तीन ज्येष्ठ प्रवाशांना गाडीतून नेले़चंदननगर : दिवाळीसाठी गावाकडे जाणाºया चाकरमान्यांची खासगी ट्रॅव्हल्सचालकांकडून लूट सुरू आहे. एसटीचा संपही खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांसाठी फायद्याचा ठरत असून प्रवाशांच्या गरजेचा गैरफायदा घेतला जात आहे. दरवाढीवर कोणाचेच नियंत्रण नसल्याने तिकिटाचे दर तब्बल चारपटीने जादाआकारण्यात येत आहेत. त्यामुळे ट्रॅव्हल्स कंपनीचालकांची दिवाळी जोरात असली तरी, प्रवाशांचे मात्र दिवाळे निघत आहे.नागपूर, औरंगाबाद, बीड ,नागपूर, नांदेड, अमरावती, मध्य प्रदेश, इंदोर, यवतमाळ, बुलडाणा, नंदुरबार, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या भागात पुण्यातून नगर रस्तामार्गे जाणाºया सर्व गाड्यांचे बुकिंग फुल झाले आहे. याला अपवाद खासगी बसही नाहीत, परंतु प्रवाशांनी आग्रह केलाच आणि जादा पैसे म्हणजे चार ते पाचपट रक्कम दिली तर तिकीट उपलब्ध होत आहे. नगर रस्तामार्गे जाणाºया खासगी गाड्यांमध्ये ना एसी, ना इतर सुविधा. प्रवाशांना अवाच्या सव्वा देऊनदेखील सुविधा मिळत नाहीत. खासगी गाड्यांपेक्षा एसटी महामंडळाच्या गाड्या बºया असल्या, तरी त्यांच्या संपाचा तोटा प्रवाशांना सहन करावा लागत आहे.पीएमटी कामगार संघाचा एसटी संपाला पाठिंबामहाराष्ट्र एसटी कामगारांच्या वेतनात वाढ करण्याच्या मागणीसाठी केलेल्या संपाला पीएमटी कामगार संघ (इंटक) च्या वतीने जाहीर पाठिंबादेण्यात आला आहे़अध्यक्ष राजेंद्र खराडे, महासचिव नुरुद्दीन इनामदार यांनी मंगळवारी स्वारगेट एसटी डेपोमध्ये जाऊन पाठिंब्याचे पत्र दिले़संपाने विद्यार्थी हवालदिल४ नगर, सातारा, नाशिक अशा पुण्यापासून जवळ असलेल्या शहरांमध्ये जाण्यासाठी खासगी बसचा पर्याय विद्यार्थ्यांनी स्वीकारला. मात्र त्यासाठी खासगी बसचालकांकडून खूपच जास्तीचे भाडे घेतले जात होते. नागपूर, अमरावती, बुलडाणा अशा लांब पल्ल्याच्या खासगी बसचे संपानंतर वाढलेले दर विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेरचे असल्याने त्यांना गावी जाण्याचा निर्णय रद्द करावा लागला. काही विद्यार्थ्यांनी रेल्वेने गावाला जाण्याचा पर्याय निवडला. त्यामुळे सर्वच रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी झाली.स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया काही विद्यार्थ्यांची परीक्षा येत्या ५ नोव्हेंबरपासून असल्याने त्यांनी गावाला न जाता पुण्यातच राहून परीक्षेचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा नाही ते यापूर्वीच गावाला गेल्याने त्यांचा मोठा त्रास वाचला.गावी जाण्यासाठी सुट्यांची आतुरतेने वाट पाहणाºया विद्यार्थ्यांना एसटी कर्मचाºयांनी रविवारी रात्रीपासून अचानक पुकारलेल्या संपाचा मोठा फटका बसला. विशेषत: मुलींना या एसटीच्या संपाची मोठी झळ बसली आहे, अनेकांना गावी जाण्याचे बेत पुढे ढकलावे लागले आहे.महाविद्यालयातील पदवीच्या काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा सोमवारी संपल्या. त्यामुळे सोमवारी दुपारनंतर गावाला जाण्यासाठी अनेक विद्यार्थी निघणार होते. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांनी रविवारी रात्री गावी जायचे ठरविले होते.अनेक मुलींनी सोमवारी सकाळी गावाला जाण्याचे बसचे रिझर्व्हेशन केले होते. मात्र अचानक एसटी बसचा संप सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे.
‘ट्रॅव्हल्स’ची दिवाळी; प्रवाशांचे दिवाळे, एसटी कर्मचाºयांचा संप सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 3:23 AM