मराठवाड्यातील दुष्काळी भागात आढळला ‘ट्री फ्रॉग'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 12:53 PM2020-12-07T12:53:41+5:302020-12-07T12:53:56+5:30

बेडकू आढळून येणं हा त्या परिसरातील पर्यावरणीय गुणवत्ता चांगले असल्याचे द्योतक आहे.

'Tree frog' found in drought prone areas of Marathwada | मराठवाड्यातील दुष्काळी भागात आढळला ‘ट्री फ्रॉग'

मराठवाड्यातील दुष्काळी भागात आढळला ‘ट्री फ्रॉग'

Next
ठळक मुद्देमानवाला उपद्रवी किडे, किटक हा बेडूक फस्त करतो. म्हणून तो मानवासाठी उपयुक्त ठरणारा

पुणे : चांगले पर्यावरण असलेल्या ठिकाणी झाडावरील बेडूक ट्री फ्रॉग (पॉलीपेडेट्स मॅकुलॅटस प्रजाती) पहायला मिळतो. हा बेडूक आडस (ता. केज. जि. बीड) या ठिकाणी आढळून आला आहे. त्यामुळे या परिसरातील पर्यावरणीय मुल्य चांगले असून, या बेडकाचे जतन आवश्यक आहे. मानवाला उपद्रवी किडे, किटक हा बेडूक फस्त करतो. म्हणून तो मानवासाठी उपयुक्त ठरणारा आहे. यापूर्वी कोकणातच हा बेडूक दिसत असल्याची नोंद आहे.

झाडावरील बेडकाची प्रथम १८३० मध्ये जॅान ॲडवर्ड ग्रे यांनी जगाला ओळख करून दिली. दक्षिण आशियामध्ये हा बेडूक दिसून येतो. कोकणात आंबोली परिसरात दिसतो. तर मराठवाड्यात हा क्वचित दिसून येतो. आतापर्यंत कोणाला दिसल्याची माहिती उपलब्ध नाही. या बेडकाला चुनाम असेही नाव आहे. हा तमिळ शब्द आहे. तर संस्कृतमध्ये चुर्ण म्हटले जाते. भिंतीवर देखील हा बेडूक दिसतो.

जंगलात दिसतात किंवा एखाद्या ठिकाणी झाड आणि ओलावा असेल तर गावातही आढळून येतात. आंबोली तालुक्यात उडता बेडूक आढळतो. पायाच्या बोटांमध्ये पडदे असलेल्या आपल्या शारीरिक रचनेचा वापर करून तो एका झाडावरून उडत दुसऱ्या झाडावर जातो.
 झाडावरील बेडकांच्या पायांच्या बोटांचा आकार टोकाकडे पसरट, थाळीसारखा झालेला असतो.  बेडकांच्या डोळ्यातील बाहुल्या आकाराने आडव्या असतात. तसेच या बेडकांच्या पायावर आतील बाजूस भडक रंगाचे पट्टे असतात; जे बेडकाने उडी मारल्यावर एकदम चमकतात. या भडक रंगाचा वापर करून बेडूक आपल्या शत्रुला चकवतात. आणि स्वत:चा बचाव करतात.  झाडावरच्या बेडकांची शक्ती लांब उडया मारण्यातच सामावलेली असते.
 ==========================
बेडकू आढळून येणं हा त्या परिसरातील पर्यावरणीय गुणवत्ता चांगले असल्याचे द्योतक आहे. किटक, किडे हे यांचे खाद्य असून, ते शेतकऱ्यांना उपयोगी ठरतात. यांना ‘चुनाम’असेही म्हणतात. हा तमिळ शब्द आहे. हा भिंतीवर सहसा दिसून येतो. जंगलात मोठ्या प्रमाणावर दिसतात.
- डॅा. के. पी. दिनेश, प्राणिसंशोधक, भारतीय प्राणी सर्व्हेक्षण संस्था, पुणे
===========================================

बेंगलुरूमध्ये आढळली ‘ब्यूरोविंग फ्रॉग’ प्रजाती
बेंगलुरू शहराच्या उपनगरात बेडकाची नवीन ‘ब्यूरोविंग ’ची प्रजाती आढळून आली आहे. त्याला ‘स्फेरोथेका बेंगलुरु’ असे त्याचे नामकरण केले आहे. या विषयीचा लेख न्यूझिलंडच्या ‘झूटॅक्सा या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. बेंगलुरू मध्ये अनेक चांगले पाण्याचे स्त्रोत आहेत. पण हा बेडूक अधिवास नसलेल्या ठिकाणावर आढळला. यांचा अधिवास तयार करण्याचे आव्हान असणार आहे. पुण्यातील भारतीय प्राणी सर्व्हेक्षण संस्थेतील संशोधक डॅा. के. पी. दिनेश यांच्यासह पी. दीपक, डॅा. ॲनेमरी ओहलर, प्रा. कार्तिक शंकर, बी. एच.  चांडकेशामूर्ती, जे. एस. आशादेवी या टीमला हा बेडूक आढळला. 

 

Web Title: 'Tree frog' found in drought prone areas of Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.