वादळी पावसामुळे पडली झाडे
By admin | Published: May 12, 2016 01:41 AM2016-05-12T01:41:02+5:302016-05-12T01:41:02+5:30
शहर व उपनगरांमध्ये बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. अर्धा तास पडल्यानंतर पाऊस मात्र गायब झाला. वादळी पावसामुळे १४ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या
पुणे : शहर व उपनगरांमध्ये बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. अर्धा तास पडल्यानंतर पाऊस मात्र गायब झाला. वादळी पावसामुळे १४ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. शनिवार पेठेत घरावर झाड पडले तर पुणे स्टेशनला चारचाकी वाहनावर झाड पडल्याने वित्तहानी झाली.
सोमवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला होता. मंगळवारीही दिवसभर ढगाळ हवामान होते. मात्र पाऊस पडला नाही. आज सकाळपासून ढगाळ हवामान होते. दुपारी अचानकपणे काळे ढग दाटून येत अडीच वाजण्याच्या सुमारास वादळी वारा सुटला आणि पावसास सुरुवात झाली. काही ठिकाणी पावसास जोर होता, तर काही ठिकाणी पावसाची एक-दोन सरीच पडल्या. शहरातील विविध पेठांमध्ये, दापोडी, बोपोडी, खडकी, येरवडा, पुणे स्टेशन, कोथरूड, वारजे, सिंहगड रस्ता, वाघोली, वडगाव धायरी आदी भागांमध्ये जोरदार पाऊस पडला. शिवाजीनगर येथे सायंकाळी साडेपाचपर्यंत ४ मिमी पाऊस पडल्याची नोंद पुणे वेधशाळेत झाली.