स्वयंसेवक श्रीकांत लिंगायत यांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:10 AM2021-03-16T04:10:33+5:302021-03-16T04:10:33+5:30
सोलापूर बाजार येथील रहिवासी असलेले लिंगायत हे व्यवसायाने सीए होते. त्यांची १५ मार्च, १९८२ साली हत्या करण्यात ...
सोलापूर बाजार येथील रहिवासी असलेले लिंगायत हे व्यवसायाने सीए होते. त्यांची १५ मार्च, १९८२ साली हत्या करण्यात आली होती. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. त्यांनी अनेक स्वयंसेवक तयार केले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विस्तारत त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यार्थ भोपळे चौक व पुलगेट येथे स्मृतिस्तंभ उभारण्यात आला असून, त्यांची आठवण म्हणून दरवर्षी १५ मार्चला श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला जातो.
पुलगेट येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे आयोजन भाजप युवामोर्चाचे शहर उपाध्यक्ष संतोष यादव उपस्थित होते. यावेळी रणवीर आरगडे, लालचंद अहिर, बब्बा परदेशी, आनंद शितोळे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.