पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री, राजकीय नेते यांच्या हस्ते ध्वजारोहणही करण्यात आले. त्याबरोबरच मंदिरे आणि धार्मिक स्थळांवर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर मधील पवित्र शिवलिंगावर भारताच्या तिरंगा ध्वजातील रंगाप्रमाणे आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.
भीमाशंकर मधील ब्रम्हवृंद, गुरव यांनी हि फुलांची सजावट केली होती. भीमाशंकर मंदिर बंद असल्याने मंदिरात अभिषेक होत नाहीत, त्यामुळे १५ ऑगस्टच्या दिवशी शिवलिंग व मंदिर पुर्ण केशरी, पांढरा व हिरव्या रंगाने सजवण्यात आले होते.
अतिशय आकर्षक व सुंदर सजावट करण्यात आली होती. शनिवार, रविवार, सोमवार सुट्टी असल्यामुळे अनेक लोक भीमाशंकर कडे जाण्याचा प्रयत्न करत होते. काही लोक कोकणातून शिर्डी घाटामार्गे पायी भीमाशंकर मध्ये येत होते.
भुलेश्वरची तिरंगा पुजापुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील माळशिरस येथील श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथे १५ ऑगस्ट निमित्ताने आकर्षक तिरंगा पुजा करण्यात आली