समस्या निवारणासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:12 AM2021-08-23T04:12:37+5:302021-08-23T04:12:37+5:30
बारामती तालुक्यातील नागरिकांना लाभ बारामती: बारामती तालुका व शहरातील नागरिकांच्या समस्या व अडीअडचणी सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार ...
बारामती तालुक्यातील नागरिकांना लाभ
बारामती: बारामती तालुका व शहरातील नागरिकांच्या समस्या व अडीअडचणी सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार लोकाभिमुख अभिनव उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
बारामती येथील राष्ट्रवादी भवनमध्ये झालेल्या उपक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील व एकात्मिक समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भवन कसबा-बारामती येथे उपस्थित होते. या वेळी अनेक नागरिकांच्या अडीअडचणी व समस्या तालुकास्तरावर तत्काळ सोडवल्या. दर गुरुवारी होणाऱ्या उपक्रमास नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. अनेक नागरिक आपल्या समस्या व अडचणी मांडत आहेत. तसेच, यापुढे हा उपक्रम दर आठवड्याच्या सोमवारी व गुरुवारी सकाळी १० ते ०२ यावेळेत राबविला जाणार असून या उपक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील, एकात्मिक विकास समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, सभापती नीता फरांदे, विविध संस्थांचे पदाधिकारी व शासकीय कमिटीचे अध्यक्ष, सदस्य व लोकप्रतिनिधी उपस्थित राहून अडीअडचणी सोडविण्यासाठी सहकार्य, मदत व मार्गदर्शन करणार आहेत. तरी तालुका व शहरातील नागरिकांनी संपर्क साधावा. सदरचा उपक्रम हा दर आठवड्याचा सोमवार व गुरुवार या दोन्हीदिवशी चालू राहणार असल्याची माहिती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष तथा संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष धनवान वदक यांनी दिली.
बारामती शहरातील राष्ट्रवादी भवन येथे नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात येत आहे.
२२०८२०२१-बारामती-०३