तालुक्यातील इंदापूर, कालठण, पळसदेव, भिगवण, शेळगाव या पाच गटांमधून प्रत्येकी ३ संचालक, भटक्या जमाती प्रवर्ग १, मागास प्रवर्ग १, अनुसूचित जमाती १, महिला राखीव २ आणि ब वर्ग १ अशा एकूण २१ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास २२ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून, २४ सप्टेंबर हा नामनिर्देशनसाठी शेवटचा दिवस असेल सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यलय येथे उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्जाची छाननी २७ सप्टेंबर रोजी होणार आहे, २८ सप्टेंबर रोजी पात्र उमेदवार यांची यादी प्रसिद्ध होइल, १२ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारास अर्ज मागे घेता येणार आहेत. १३ ऑक्टोबर रोजी अंतिम उमेदवारांची यादी व चिन्हांचे वाटप होईल, आवश्यकता असल्यास मतदान २० ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत होईल, मतदान मोजणी २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता सुरू होईल असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
सध्या या कारखान्यावर भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादी विद्यमान मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी कारखान्याबाबत पक्षाची भूमिका जाहीर केली नाही, त्यामुळे आगामी दोन दिवसांत चित्र स्पष्ट होणार आहे.