मंगळवारी २७६ कोरोनाबाधित, ३१० कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:09 AM2021-07-21T04:09:13+5:302021-07-21T04:09:13+5:30
पुणे : शहरात मंगळवारी २७६ कोरोनाबाधित आढळून आले असून, ३१० जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ...
पुणे : शहरात मंगळवारी २७६ कोरोनाबाधित आढळून आले असून, ३१० जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार १७८ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ३़ ८४ टक्के इतकी आढळून आली आहे़
शहरातील सक्रिय रुग्णसंख्या २ हजार ८१५ इतकी असून, आज दिवसभरात १२ जणांचा मृत्यू झाला आह़े़ यापैकी ६ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १़ ७९ टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २२९ इतकी असून आॅक्सिजनसह उपचार घेणाºयांची संख्या ३८९ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २७ लाख ९९ हजार १८७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८४ हजार ३५६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७२ हजार ८३९ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ७०२ जणांचा मृत्यू झाला आहे.
--------