शेलपिंपळगाव आरोग्य केंद्राला दोन ॲाक्सिजन कॉन्सन्ट्रेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:08 AM2021-06-26T04:08:59+5:302021-06-26T04:08:59+5:30
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सयाजीराजे मोहिते, युवानेते मयुर मोहिते, सरपंच विद्या मोहिते, उपसरपंच संदीप मोहिते, लुकास कंपनीचे ...
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सयाजीराजे मोहिते, युवानेते मयुर मोहिते, सरपंच विद्या मोहिते, उपसरपंच संदीप मोहिते, लुकास कंपनीचे मुख्य व्यवस्थापक गजानन पाटील, उमेश मोरे, राम गाडेकर, सुनिल मोरे, कांचन शिंदे, सुनिता ठाकुर, निखील मोहिते, वैभव मोहिते, तुषार मोहिते, छाया इंगळे, अंकुश दौंडकर, राजेंद्र कोळी, संतोष महामुनी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
शेलपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एकूण १९ गावांचा समावेश होत असल्याने याठिकाणी ॲाक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची आवश्यकता होती. त्यामुळे कंपनीच्या माध्यमातून मिळालेल्या कॉन्सन्ट्रेटरमुळे रुग्णांना त्याचा लाभ घेता येणार आहे. विशेष म्हणजे येथील रुग्णालयाला अद्यावत नवीन तंत्रज्ञानाचे मशीन उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार दिलीप मोहिते - पाटील यांनी सांगितले.
२५ शेलपिंपळगाव
आरोग्य केंद्राला ॲाक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देताना आमदार दिलीप मोहिते - पाटील व इतर.