कोर्ट आवारात तंबाखू खाऊन थुंकणे दोन पोलिसांना पडले महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 01:40 PM2020-01-31T13:40:39+5:302020-01-31T13:45:12+5:30

न्यायालयाने ठोठावला दंड..

Two police penalty for spit tobacco in court area | कोर्ट आवारात तंबाखू खाऊन थुंकणे दोन पोलिसांना पडले महागात

कोर्ट आवारात तंबाखू खाऊन थुंकणे दोन पोलिसांना पडले महागात

Next
ठळक मुद्देपोलीस उपआयुक्तांनी कारवाई करून अहवाल द्यावायेत्या १५ दिवसांच्या आत अहवाल देण्याचे आदेश

पुणे : न्यायालयाच्या आवारात थुंकणाºया व्यक्तींवर कायदेशीर दंड करून त्यांना अद्दल घडविणाºया पुणे जिल्हा न्यायालयाने आता पोलिसांचे देखील कान उपटले आहेत. गुरुवारी न्यायालयाच्या आवारात दोन पोलीस कर्मचारी तंबाखू खाऊन थुंकताना आढळले. त्यांच्यावर कारवाई करुन ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने पोलीस उपआयुक्तांना १५ दिवसांच्या आत अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. 
गेल्या काही दिवसांपूर्वी न्यायालयाच्या आवारात तंबाखू, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांवर कारवाई करणार, असे पत्रक जिल्हा न्यायालयाने काढले होते. त्यानुसार अनेकांवर कारवाई देखील करण्यात आली. गुरुवारी पुणे बार असोसिएशनच्या कार्यकरिणीची निवडणूक असताना तिथे हजर असलेल्या दोन पोलीस हवालदारांनी नियमांचे उल्लंघन केले. मतदान केंद्रावर एक पोलीस हवालदार थुंकत असल्याचे  अ‍ॅड. विकास शिंदे, अ‍ॅड. राहुल वंजारी, अ‍ॅड. प्रतीक जगताप यांच्या लक्षात आले. याप्रसंगी शिंदे यांनी संबंधित पोलीस हवालदाराचे थुंकताना चित्रीकरण केले. यानंतर   नवीन इमारतीच्या दुसºया मजल्यावरील मा. एस. बी. पाटील (एसी कोर्ट) साहेबांच्या न्यायालयाबाहेर अ‍ॅड. शिंदे व अ‍ॅड. ढवळे थांबले असताना शेजारील खिडकीजवळ त्याच कोर्टातील एका पोलीस हवालदाराने तंबाखू तोंडात टाकली आणि काही वेळाने खिडकीत थुंकून टाकली. याचेही सर्व चित्रीकरण करण्यात आले आहे. 
  पुढे हा सर्व प्रकार अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायाधीश एस. आर. नावंदर साहेब यांच्याकडे अ‍ॅड. शिंदे यांनी लेखी तक्रार करून निदर्शनास आणून दिला. यावर जिल्हा न्यायधीशांंनी कोर्टाच्या आवारात अस्वच्छता करणाऱ्या त्या दोन पोलीस हवालदारांची चौकशी करून त्यांच्यावर येत्या १५ दिवसांच्या आत अहवाल देण्याचे आदेश पोलीस उपआयुक्तांना दिले आहेत.
..........
कोर्टात स्वच्छता  ठेवावी याची जबाबदारी केवळ 
वकिलांची नव्हे तर सर्वांची आहे. यापूर्वी नागरिकांना स्वच्छता राखावी यासाठी आवाहन करण्यात आले. त्यांनी नियमांचे उल्लंघन करण्यास सुरुवात केल्यानंतर कायदेशीररीत्या कारवाई करण्यात आली. मात्र, ज्यांच्याकडून कायद्याची अंमलबजावणी केली जाते, त्यांच्याकडूनच नियम धाब्यावर बसवले जात असल्यास ही गंभीर बाब आहे. संबंधित पोलीस हवालदारांची वर्तणूक बेजबाबदार म्हणावी लागेल. - अ‍ॅड. विकास शिंदे 

Web Title: Two police penalty for spit tobacco in court area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.