पुणे : खिशात दोन हजारांची नवीन नोट आल्यानंतर आनंदाने बाजारपेठेत खरेदीसाठी गेल्यानंतर अनेक ठिकाणी सुट्या पैशांची अडचण येत असल्याचे ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीत निदर्शनास आले. यामध्ये भाजी विक्रेत्यांकडे किमान ३०० ते ४०० रुपयांची भाजी घेतली तरच दोन हजार रुपये सुट्टे देऊ, हॉटेलमध्ये सुट्यापैशाची अडचण येताना दिसली नाही, तर हॉस्टेल, शिक्षण घेण्यासाठी आलेले विद्यार्थी तीन-चार मित्रांचे मिळून नाष्टा, जेवणाचे बिल देतात. लहान मोठी खरेदीसाठी दुकानदारांकडे सुट्टे पैसे नाहीत, यामुळे खिशामध्ये दोन हजारांची नोट असूनदेखील फारसा उपयोग होत नसल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांनी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीकडे व्यक्त केल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० रुपये चलनातून बाद करून दोन हजारांची नवीन नोट चलनामध्ये आणील. सध्या दैनंदिन खर्चासाठी नागरिकांना पैशाची गरज असून, शंभर, दोन हजाराची नोट मिळविण्यासाठी बँका, एटीएममध्ये रांगा लावत आहेत. बँकांमध्ये जुन्या नोटांच्या बदल्यात दोन हजारांच्या नोटा दिल्या जातात. तर एटीएममधून शंभराच्या नोटा मिळण्यासाठी तास-तास रांगांमध्ये उभे राहावे लागत आहे.
दोन हजारांची नोट मिरवण्यापुरती?
By admin | Published: November 15, 2016 3:45 AM