Accident: पुणे - सोलापूर रस्त्यावर दुचाकीस्वाराचा अपघात; मुलगा बचावला वडिलांचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 01:52 PM2022-02-17T13:52:45+5:302022-02-17T15:18:09+5:30

पत्नीला सोडून आपल्या मुलासोबत हडपसरला राहत्या घरी येत असताना पुणे सोलापूर रस्त्यावर हा अपघात घडला

two wheeler accident on pune solapur road Son rescues unfortunate father death | Accident: पुणे - सोलापूर रस्त्यावर दुचाकीस्वाराचा अपघात; मुलगा बचावला वडिलांचा दुर्दैवी मृत्यू

Accident: पुणे - सोलापूर रस्त्यावर दुचाकीस्वाराचा अपघात; मुलगा बचावला वडिलांचा दुर्दैवी मृत्यू

Next

वानवडी : पुणे-सोलापूर रस्त्यावरील ब्रँड फँक्ट्री व क्रोम मॉल समोरील चौकात झालेल्या अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला असून तेरा वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. ट्रकची धडक बसल्याने झालेल्या अपघातात हेमंत शहाजी खैरे (वय ४५, रा. त्रिमूर्ती काँलनी, सिरम कंपनी समोर हडपसर) यांचा मृत्यू झाला आहे व त्यांचा मुलगा पार्थ खैरे (वय १३) हा जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री पावने अकरा च्या सुमारास हेमंत खैरे हे घरगुती कामानिमित्त पत्नीला सोडण्यासाठी पाषाणला गेले होते. पत्नीला सोडून आपल्या मुलासोबत हडपसरला राहत्या घरी येत असताना पुणे सोलापूर रस्त्यावरील क्रोम माँल चौकात मिक्सर ट्रक ( एमएच १४ ईएम ४२१८ ) सोलापूर च्या दिशेने जात असताना खैरे यांच्या दुचाकी गाडीला ( एमएच १२ एके ७४७१) बाजूने धडक बसल्याने अपघात झाला. अपघातात दुचाकीवरील हेमंत खैरे व पार्थ रस्त्यावर पडले असताना हैमंत खैरे यांच्या अंगावरुन ट्रकचे पुढील चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. वडिलांची भीषण अवस्था पाहून घाबलेल्या मुलांने हंबरडा फोडला.

वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, ट्रकखाली अडकलेल्या खैरे यांना बाहेर काढून ससून रुग्णालयात नेले असता डाक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. ट्रकचालक रामचंद्र धर्मांना शिंगे (वय ४३, रा. हिंगनेमळा, हडपसर) यांस पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.  हेमंत खैरे यांचे बंधू अमित खैरे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

घटनास्थळी वानवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड, गुन्हे विभागाचे पो. निरीक्षक सावळाराम साळगावकर, पो. उपनिरीक्षक विशाल मोहिते, हरीशचंद्र केंजळे, भुषण पोटवडे उपस्थित राहून परिस्थिती संभाळली तसेच झालेली वाहतूक कोंडी वाहतूक विभागाचे पो. उपनिरीक्षक सोहेल इनामदार यांनी सुरळीत केली.

Web Title: two wheeler accident on pune solapur road Son rescues unfortunate father death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.