पुण्यातील कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट, दोन कामगारांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 01:28 PM2019-08-14T13:28:40+5:302019-08-14T16:17:00+5:30

कात्रज बोगद्यापुढे वेळू येथील एका कंपनीमध्ये बुधवारी (14 ऑगस्ट) बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे.

Two workers killed after boiler blast in pune | पुण्यातील कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट, दोन कामगारांचा मृत्यू 

पुण्यातील कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट, दोन कामगारांचा मृत्यू 

Next
ref='https://www.lokmat.com/topics/pune/'>पुणे : खेड शिवापूर येथील परिसरातील वेळू (ता.भोर) येथे सि पी एच मॅन्युफॅक्चरिंग पीएलएल या अनधिकृत कंपनीला सुमारे बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास आग लागून त्यामधील बॉयलरचा स्फोट होऊन दोन जण जागीच ठार झाले. स्फोट एवढा भयंकर होता की, दोन कामगार अडीचशे फूट उंच व चारशे फूट लांब उडून पडले होते व या स्फोटाचा आवाज दोन ते तीन किलोमीटर लांब असलेल्या नागरिकांना ऐकू आला. या अपघातात मनेजर प्रसाद राजंदर प्रसाद (वय २७) रा.बडली, नयनिजोर, जि.बकसर,बिहार व विकास सिंग (वय ३५) इलाहाबाद, उत्तरप्रदेश ) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. दोन ते अडीच महिन्यांपूर्वी वेळू (ता.भोर) येथील ग्रामपंचायतने कंपनीला ही कंपनी अनधिकृत असल्याने नोटिसेद्वारे कळवून बंद करण्यास सांगितले होते, परंतु, रात्री अपरात्री ही कंपनी चोरी छुपे सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, सकाळी दहा वाजून पंचेचाळीस वाजले असता स्फोट झालेला परिसरातील नागरिकांना आवाज आला. त्यानंतर स्थानिकांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता आग लागल्याचे दिसले. दोन कामागरांपैकी एक जण कंपनीच्या अडीचशे फूट उंच उडून सुमारे चारशे ते पाचशे फूट लांब वर पडला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याठिकाणी अशा बऱ्याच वेळा घटना घडत आहेत परंतु यावर ग्रामपंचायत काही ठोस भूमिका घेत नाही हे या घटनेवरून समजत आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. याआधी शिंदेवाडी (ता.भोर ) याठिकाणी २० मार्च २०१९ रोजी क्लासिक कोच बिल्डर्स या कंपनीला आग लागून कोट्यवधींचे नुकसान झाले होते. त्यानंतर संबधित प्रशासनाने कोणतीच उपाय योजना केल्याचे दिसून येत नाही हे या घटनेवरून समजत आहे. घटना घडल्यानंतर लागलीच राजगड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, संतोष तोडकर, संतोष कालेकर, अंबादास बुरटे, बाप्पू कदम, हे पोलीस पथक व भोरच्या प्रभारी तहसीलदार मृदुला मोरे, मंडलाधिकारी विद्या गायकवाड, ग्रामसेवक रेखा आर. रणनवरे, माजी जि. प.सदस्य कुलदीप कोंडे, भोर चे माजी उपसभापती अमोल पांगारे, हिरामण पांगारे, आदी उपस्थित होते

Web Title: Two workers killed after boiler blast in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.