दौंड : दौंड महाविद्यालयाच्या रस्त्यालगत एका इमारतीच्या खड्ड्यात दुचाकीसह दोन मुली पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. तेव्हा या इमारतीच्या खड्ड्याच्या परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेणे काळाची गरज आहे. या इमारतीचे बांधकाम अर्धवट असून खाली खोल खड्डा आहे. हा खड्डा रस्त्यालगत असल्याने या रस्त्याला संरक्षक कठडे नाहीत. तेव्हा दुपारच्या सुमारास दोन तरुणी स्कूटी घेऊन जात असताना या दोघीही थेट दुचाकीसह सात ते आठ फूट खड्ड्यात पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिक त्यांच्या मदतीला धावून गेले, म्हणून पुढील अनर्थ टळला. शहरातील सर्वात धोकादायक परिसर म्हणून या इमारतीचा नामोल्लेख होत असल्याचे एकंदरीत चित्र आहे.
खड्ड्यात दुचाकी कोसळल्याने २ तरुणी जखमी
By admin | Published: December 22, 2016 1:36 AM