अनधिकृत नळजोड तोडले
By admin | Published: November 15, 2016 03:47 AM2016-11-15T03:47:31+5:302016-11-15T03:47:31+5:30
वारजे माळवाडीमधील गोकुळनगर परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे, अशी तक्रार महापालिका पाणीपुरवठा विभागाकडे नागरिक वारंवार करीत
कर्वेनगर : वारजे माळवाडीमधील गोकुळनगर परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे, अशी तक्रार महापालिका पाणीपुरवठा विभागाकडे नागरिक वारंवार करीत होते. पालिकेने या ठिकाणी रीतसर नळकोंडाळे दिले असून, पिण्याचा पाण्याचा प्रश्न नागरिकांना भेडसावत होता. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन पालिका कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता अनेक ठिकाणी बेकायदेशीर नळजोड आढळून आले.
काही नागरिकांनी पाऊण इंची नळजोड बेकायदेशीरपणे घेतले होते. गोकुळनगर परिसरातील २१ अनधिकृत नळजोड या वेळी पालिकेकडून कारवाई करत तोडण्यात आली आहेत. तसेच, गणपती माथा परिसरातील अमर भारत सोसायटी मधील ३ नळजोड आणि विठ्ठलनगर परिसरातील दोन नळजोड तोडण्यात आली आहेत. या वेळी २० फूट पिव्हीसी ८० फूट लोखंडी पाईप जप्त करण्यात आला आहे.
कनिष्ठ अभियंता सुनील कदम, फिटर राजू पलमाटे आणि पालिका कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते. (वार्ताहर)