पुणे : पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे अनावरण, मेट्रो उदघाटन, इ बस सेवा उदघाटन मोदींच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पुण्यातील एमआयटी कॉलेजच्या प्रांगणात मोदींच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र आणि शिवाजी महाराज यांच्याबद्दल अनावश्यक वक्तव्य करणाऱ्यांना टोला लगावला आहे. महत्वाच्या पदांवरील व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य महाराष्ट्राला परवडणारे नाहीत असा ते यावेळी म्हणाले आहेत.
पवार म्हणाले, मला पंतप्रधान यांना लक्षात आणुन द्यायच आहे. की काही मान्यवर व्यक्तीकडून अनावश्यक वक्तव्य केले जात आहेत. ते महाराष्ट्राला परवडणारे नाही त्यामुळं याकडेही लक्ष द्यावे अशी विनंती त्यांनी मोदींना केली आहे.
मेट्रोच्या कामात कुठलंही राजकारण करू नका
काही नेत्याच्या हट्टापायी मेट्रो सुरू व्हायला १२ वर्ष गेली. पुणेकरांच्या सहनशीलतेला दाद दिली पाहिजे. मेट्रो कशी सुरू करायची याला वेळ गेला,मात्र अखेर काम सुरु झालं आणि ती सुरु झाली. पिंपरी चिंचवड ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज, स्वारगेट ते हडपसर,शिवाजीनगर ते खराडी या मार्ग सुरू करण्यास मदत घ्यावी. गडकरी साहेबांमुळे नागपूर लवकर सुरू झाली,त्यामुळे इतर ठिकाणी मदत द्यावी ही विनंती पवार यांनी केली आहे. कामात राजकारण न आणता ती पूर्ण करावीत. असही ते म्हणाले आहेत.